स्ट्रॉबेरीच्या जोडीला रासबेरी अन् गुजबेरी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 07:53 IST2025-01-20T07:53:17+5:302025-01-20T07:53:47+5:30

Satara Agriculture News: पर्यटनस्थळाबरोबरच ‘स्ट्रॉबेरी लँड’ अशी ओळख प्राप्त करणाऱ्या महाबळेश्वरात आता स्ट्रॉबेरीच्या जोडीला रासबेरी व गुजबेरीदेखील विक्रीस उपलब्ध झाली आहे. रासबेरीचा दर १ हजार २००, तर गुजबेरी ६०० रुपये प्रतिकिलो या दराने विकली जात आहे.

Strawberries paired with raspberries and gooseberries! | स्ट्रॉबेरीच्या जोडीला रासबेरी अन् गुजबेरी !

स्ट्रॉबेरीच्या जोडीला रासबेरी अन् गुजबेरी !

सातारा - पर्यटनस्थळाबरोबरच ‘स्ट्रॉबेरी लँड’ अशी ओळख प्राप्त करणाऱ्या महाबळेश्वरात आता स्ट्रॉबेरीच्या जोडीला रासबेरी व गुजबेरीदेखील विक्रीस उपलब्ध झाली आहे. रासबेरीचा दर १ हजार २००, तर गुजबेरी ६०० रुपये प्रतिकिलो या दराने विकली जात आहे. असे असले तरी पर्यटकांमधूनही या फळांना मागणी वाढली आहे.

स्ट्रॉबेरी हे महाबळेश्वरचे मुख्य पीक असून शेतकऱ्यांना अर्थबळ प्राप्त करून देणाऱ्या स्ट्रॉबेरी पिकाबरोबरच काही शेतकरी रासबेरी, गुजबेरीची लागवड करून उत्पादन घेऊ लागले आहेत.

रासबेरी : स्ट्रॉबेरीच्या तुलनेत या फळांचे उत्पादन अत्यल्प असते रासबेरी हे गुलाब कुटुंबातील एक फळ आहे. हे फळ लाल, काळे, पिवळे किंवा जांभळ्या रंगाचे असते.  

गुजबेरी : हे फळ पिवळ्या रंगाचे असून, आकार गोलाकार असतो. याची चव आंबट-गोड असते. या फळांचा दर अधिक असला तरी पर्यटकांमधून मागणी वाढू लागली आहे.

Web Title: Strawberries paired with raspberries and gooseberries!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.