शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदरेंचा पुरस्कार थांबवा

By admin | Updated: August 18, 2015 00:52 IST

उदयनराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र : आक्षेपांचा सोक्षमोक्ष लावा

सातारा : बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारावरून उठलेल्या वादात आता शिवरायांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनीही उडी घेतली आहे. पुरंदरेंच्या लेखनाबाबत घेतलेल्या आक्षेपांचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत पुरस्कार स्थगित ठेवावा, असे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. ‘महाराष्ट्र शासनाने ब. मो. ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर केला आणि तो प्रदान करण्याची तयारी केली आहे. तथापि, पुरंदरे यांनी राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या काही लेखनासंबंधात पुरस्कार जाहीर होण्यापूर्वी आणि त्यानंतर फार मोठ्या प्रमाणात आक्षेप जाहीरपणे घेतले जात आहेत. जरूर त्या अभ्यासाअंती, या आक्षेपात तथ्य असल्याचे आमचेही मत आहे आणि त्यामुळे ही बाब आम्हाला अत्यंत वेदनादायी झाली आहे. सबब या संपूर्ण आक्षेपांची तपासणी करून, जोपर्यंत सोक्षमोक्ष लागत नाही, तोपर्यंत पुरंदरे यांना जाहीर झालेला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार स्थगित ठेवावा,’ असे परखड मत खासदार उदयनराजे यांनी व्यक्त केले आहे. ‘छत्रपती शिवरायांमुळे भारत देश झाला. महाराष्ट्राला प्रतिष्ठा मिळाली. जगातील प्रगत देशांत शिवरायांविषयी संशोधन व अभ्यास केला जातो. किंबहुना राज्यकर्ता कसा असावा, तर रयतप्रेमी शिवरायांसारखा, असे दाखले जागतिक स्तरावरून केल्या जाणाऱ्या अभ्यासात नमूद केले जातात. जिजाऊ आईसाहेब तर राष्ट्रमाता आहेत. शासनाने अरबी समुद्रामध्ये १०८ फूट उंचीचे शिवस्मारक उभे करण्याचे जाहीर केले आहे. शिवराय व जिजाऊ आईसाहेब यांच्याविषयी शासनाच्या कृतिशील भावनेचे विकृतीकरण होऊ नये म्हणून तज्ज्ञांकडून लेखनाची तपासणी करून आक्षेपांचे निरसन होईपर्यंत हा पुरस्कार वितरणाचा निर्णय स्थगित करावा,’ असेही खासदार उदयनराजे यांनी नमूद केले आहे. (प्रतिनिधी) आक्षेपार्ह लेखन अधिकृत केल्याचा समज ‘बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेल्या असंविधानिक लेखनामुळे सामान्य जनतेमध्ये पुरंदरे यांना जाहीर झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’बाबत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. शासनाने पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार घोषित करून त्यांचे आक्षेपार्ह लेखन अधिकृत केल्याचा समज मोठ्या प्रमाणावर समाजात पसरत आहे,’ असे खासदार उदयनराजे यांनी नमूद केले आहे.