भांडणात महिलेच्या डोक्यात घातला दगड; दोघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 16:11 IST2021-04-07T16:09:20+5:302021-04-07T16:11:14+5:30
Crimenews Satara- सातारा येथील मंगळवार पेठेतील बोगदा परिसरात झालेल्या भांडणात एका महिलेच्या डोक्यात दगड घालण्यात आला. यामध्ये संबंधित महिला जखमी झाली असून याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना घटना मंगळवार, दि. ६ रोजी सायंकाळी घडली.

भांडणात महिलेच्या डोक्यात घातला दगड; दोघांवर गुन्हा
सातारा :येथील मंगळवार पेठेतील बोगदा परिसरात झालेल्या भांडणात एका महिलेच्या डोक्यात दगड घालण्यात आला. यामध्ये संबंधित महिला जखमी झाली असून याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना घटना मंगळवार, दि. ६ रोजी सायंकाळी घडली.
याबाबत सातारा शहर पोलिसांकडून देण्यात आलेली अधिक माहिती अशी, अश्विनी नलवडे यांचे पती अमोल नलवडे हे घरासमोर राहणारे आजोबा मधुकर पवार यांचा घराच्या अंगणात राहिलेला बटवा देण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना जया संतोष पवार आणि प्रतिक संतोष पवार (रा. मंगळवार पेठ, पॉवर हाऊस, बोगदा परिसर, सातारा) या दोघांनी शिवीगाळ, दमदाटी करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी नलवडे यांची मुलगी तन्वी हिलाही मारहाण केली.
यावेळी अश्विनी नलवडे सुरु असलेली वादावादी सोडविण्यासाठी गेल्या असता प्रतिक पवार याने त्यांच्या डोक्यात अंगणात पडलेला दगड उचलून घातला. यात त्या जखमी झाल्या आहेत. या घटनेनंतर त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पवार आणि प्रतिक पवार या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस हवालदार दगडे ते करत आहेत.