शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

गाडीच्या चाकात स्टोल अडकून महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 9:56 PM

सातारा : दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा स्टोल चाकात अडकल्यामुळे महिला रस्त्यावर आदळली. यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने संबंधित महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी दुपारी दोन वाजता कदमबाग परिसरात झाला. सारिका अभिजित देशमुख (वय २६, रा. शिवथर, ता. सातारा) असे मृत महिलेचे नाव आहे.घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ...

सातारा : दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा स्टोल चाकात अडकल्यामुळे महिला रस्त्यावर आदळली. यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने संबंधित महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी दुपारी दोन वाजता कदमबाग परिसरात झाला. सारिका अभिजित देशमुख (वय २६, रा. शिवथर, ता. सातारा) असे मृत महिलेचे नाव आहे.

घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुनील हिरोजी साबळे (२४, रा. शिवथर) हा चुलत बहीण सारिका देशमुख व तिची मुलगी अन्वी अभिजित देशमुख (४) या दोघींना घेऊन शिवथरहून साताऱ्याला दुचाकी (एमएच ११ झेड ४३५५)वरून येत होते. त्यांची दुचाकी शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कदमबाग पेट्रोल पंपासमोर आली असता सारिका यांच्या गळ्यातील ओढणी गाडीच्या मागील चाकात अडकली. त्यामुळे सारिका व तिची मुलगी अन्वी दोघी चालत्या गाडीवरून रस्त्यावर पडल्या. यात सारिकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारपूर्वीच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार किशोर जाधव करीत आहेत.अपघात सीसीटीव्हीत कैदशिवशाही बसने धडक दिल्यामुळे अपघात झाल्याचे सांगितले जात होते. पण अपघातस्थळासमोरच कदम पेट्रोल पंप आहे. या पंपावर ठिकठिकाणी सुरक्षिततेच्या कारणाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. या कॅमेºयांमध्ये हा अपघात कैद झाला आहे. यामध्ये अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होत असल्याने पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेºयांमधील फुटेज ताब्यात घेतले आहेत.साताºयातील कदमबाग पेट्रोलपंपासमोर शुक्रवारी दुपारी स्टोल चाकात अडकल्याने अपघात झाला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात