चोरट्याने रोकड तर लांबविलीच, पॅन्टही नेली चोरून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 20:16 IST2019-05-29T20:13:41+5:302019-05-29T20:16:30+5:30
खिडकीतून आत हात घालून चोरट्याने पॅन्टसह ३७ हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना साताऱ्यातील खटाव कॉलनीमध्ये घडली. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.

चोरट्याने रोकड तर लांबविलीच, पॅन्टही नेली चोरून
सातारा : खिडकीतून आत हात घालून चोरट्याने पॅन्टसह ३७ हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना साताऱ्यातील खटाव कॉलनीमध्ये घडली. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.
गिरीष सकुंडे (वय ३२, रा. खटावकर कॉलनी, समता पार्क सातारा) हे व्यावसायिक असून त्यांनी त्यांच्या घरात हँगरला पॅन्ट अडकवलेली होती. पॅन्टमध्ये त्यांनी ३७ हजारांची रोकड ठेवली होती. दरम्यान, दि. २४ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास अज्ञात चोरट्याने खिडकीतून आत हात त्यांची घालून पॅन्ट चोरून नेली.
या पॅन्टमध्ये ३७ हजारांच्या रोकडसह एटीएम, पाकीट असा ऐवज होता. सकुंडे यांना हँगरला पॅन्ट नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.