शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

जपून जा... पुढे म्हशी बांधल्यात...महामार्गावर नवा धोका। रस्ता दुभाजकातील गवत बनला चारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 7:02 PM

या महामार्गावर पुणे ते सातारा दरम्यान आजवर अनेक अपघात घडले आहेत. या अपघाताची कारणे देखील वेगवेगळी आहेत. या अपघातांमध्ये अनेकजण नाहक बळी गेले. खंबाटकी घाट व बोगदा या परिसरात गंभीर घटना घडल्या आहेत. ‘एस’ वळण तर खूपच धोकादायक आहे.

ठळक मुद्देया ठिकाणचे अपघात अत्यंत भयानक आहेत.

अभिनव पवार ।

वेळे : जागोजागी पडलेले खड्डे, खंबाटकी घाटातील ‘एस’ वळण यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आता ‘सावकाश जा... पुढे म्हशी बांधल्या आहेत,’ असा आणखी एक फलक लावण्याची वेळ आली आहे. कारण वेळे हद्दीत ग्रामस्थ चक्क रस्ता दुभाजकातच जनावरे चरण्यासाठी बांधत आहेत. त्यामुळे गेल्या आठवड्यातच एक अपघात झाला होता.

अनेक शहरांना जोडणारी रक्तवाहिनी म्हणजे अर्थातच राष्ट्रीय महामार्गाकडे पाहिले जाते; पण हाच राष्ट्रीय महामार्ग आता जणू काही मृत्यूचा सापळा बनू पाहत आहे. या महामार्गावर पुणे ते सातारा दरम्यान आजवर अनेक अपघात घडले आहेत. या अपघाताची कारणे देखील वेगवेगळी आहेत. या अपघातांमध्ये अनेकजण नाहक बळी गेले.

खंबाटकी घाट व बोगदा या परिसरात गंभीर घटना घडल्या आहेत. ‘एस’ वळण तर खूपच धोकादायक आहे. या ठिकाणचे अपघात अत्यंत भयानक आहेत. काही ठिकाणच्या महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघात झाल्याच्या अनेक घटना आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वीच कवठे येथील अपघातास जनावरे कारणीभूत ठरले.

आशियाई महामार्गाच्या दुभाजकामध्ये शोभिवंत झाडे असावीत, अशी एकंदरीत महामार्ग प्राधिकरणाची संकल्पना आहे. शोभिवंत सोडाच; पण झाडे लावायच्याऐवजी तेथे गवताचे ताटवे, झुडपे पाहावयास मिळतात. महामार्गावरील दोन्ही बाजूंच्या तिन्ही लेनमध्ये भरधाव वेगाने वाहतूक सुरू असते. काही शेतकऱ्यांना मात्र या दुभाजकामध्ये असलेल्या गवतांमध्ये जनावरे चारायचा मोह आवरत नाही. यामुळे असंख्य अपघात घडत असतानाही दुभाजकात जनावरे बांधायचे प्रमाण मात्र काही केल्या कमी होत नाही. त्यामुळे हीच जनावरे महामार्गावर येऊन अपघातास कारणीभूत ठरतात. त्यामुळे त्या जनावरांवर गुन्हा कसा दाखल करावा, याबाबत पोलीसदेखील चक्रावून जातात.दुभाजकात जनावरे बांधल्याने अपघात होऊन वाहनांचे नुकसान होते. एखादा अपघात जीवावरही बेतू शकतो. ही बाब वरवरची वाटत असली तरी खूप धोकादायक आहे. त्यामुळे अपघातात लोकांबरोबर ते जनावरेही जखमी होण्याची शक्यता आहे. लोकांना हे समजत असूनही लोक उमजून घेत नाहीत. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी प्रशासनालाच कडक पावले उचलावे लागणार आहेत.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhighwayमहामार्ग