जपून जा... पुढे म्हशी बांधल्यात...महामार्गावर नवा धोका। रस्ता दुभाजकातील गवत बनला चारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 07:02 PM2019-12-07T19:02:25+5:302019-12-07T19:05:25+5:30

या महामार्गावर पुणे ते सातारा दरम्यान आजवर अनेक अपघात घडले आहेत. या अपघाताची कारणे देखील वेगवेगळी आहेत. या अपघातांमध्ये अनेकजण नाहक बळी गेले. खंबाटकी घाट व बोगदा या परिसरात गंभीर घटना घडल्या आहेत. ‘एस’ वळण तर खूपच धोकादायक आहे.

 Stay tuned ... Next up is Buffalo ... | जपून जा... पुढे म्हशी बांधल्यात...महामार्गावर नवा धोका। रस्ता दुभाजकातील गवत बनला चारा

जपून जा... पुढे म्हशी बांधल्यात...महामार्गावर नवा धोका। रस्ता दुभाजकातील गवत बनला चारा

Next
ठळक मुद्देया ठिकाणचे अपघात अत्यंत भयानक आहेत.

अभिनव पवार ।

वेळे : जागोजागी पडलेले खड्डे, खंबाटकी घाटातील ‘एस’ वळण यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आता ‘सावकाश जा... पुढे म्हशी बांधल्या आहेत,’ असा आणखी एक फलक लावण्याची वेळ आली आहे. कारण वेळे हद्दीत ग्रामस्थ चक्क रस्ता दुभाजकातच जनावरे चरण्यासाठी बांधत आहेत. त्यामुळे गेल्या आठवड्यातच एक अपघात झाला होता.

अनेक शहरांना जोडणारी रक्तवाहिनी म्हणजे अर्थातच राष्ट्रीय महामार्गाकडे पाहिले जाते; पण हाच राष्ट्रीय महामार्ग आता जणू काही मृत्यूचा सापळा बनू पाहत आहे. या महामार्गावर पुणे ते सातारा दरम्यान आजवर अनेक अपघात घडले आहेत. या अपघाताची कारणे देखील वेगवेगळी आहेत. या अपघातांमध्ये अनेकजण नाहक बळी गेले.

खंबाटकी घाट व बोगदा या परिसरात गंभीर घटना घडल्या आहेत. ‘एस’ वळण तर खूपच धोकादायक आहे. या ठिकाणचे अपघात अत्यंत भयानक आहेत. काही ठिकाणच्या महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघात झाल्याच्या अनेक घटना आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वीच कवठे येथील अपघातास जनावरे कारणीभूत ठरले.

आशियाई महामार्गाच्या दुभाजकामध्ये शोभिवंत झाडे असावीत, अशी एकंदरीत महामार्ग प्राधिकरणाची संकल्पना आहे. शोभिवंत सोडाच; पण झाडे लावायच्याऐवजी तेथे गवताचे ताटवे, झुडपे पाहावयास मिळतात. महामार्गावरील दोन्ही बाजूंच्या तिन्ही लेनमध्ये भरधाव वेगाने वाहतूक सुरू असते. काही शेतकऱ्यांना मात्र या दुभाजकामध्ये असलेल्या गवतांमध्ये जनावरे चारायचा मोह आवरत नाही. यामुळे असंख्य अपघात घडत असतानाही दुभाजकात जनावरे बांधायचे प्रमाण मात्र काही केल्या कमी होत नाही. त्यामुळे हीच जनावरे महामार्गावर येऊन अपघातास कारणीभूत ठरतात. त्यामुळे त्या जनावरांवर गुन्हा कसा दाखल करावा, याबाबत पोलीसदेखील चक्रावून जातात.

दुभाजकात जनावरे बांधल्याने अपघात होऊन वाहनांचे नुकसान होते. एखादा अपघात जीवावरही बेतू शकतो. ही बाब वरवरची वाटत असली तरी खूप धोकादायक आहे. त्यामुळे अपघातात लोकांबरोबर ते जनावरेही जखमी होण्याची शक्यता आहे. लोकांना हे समजत असूनही लोक उमजून घेत नाहीत. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी प्रशासनालाच कडक पावले उचलावे लागणार आहेत.

 

Web Title:  Stay tuned ... Next up is Buffalo ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.