शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

आता पाण्यासाठी ‘जागते रहो’! पाणी वळवतील म्हणून व्हॉल्व्हजवळ ग्रामस्थांचा रात्रीही मुक्काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 05:28 IST

आतापर्यंत चोरांच्या भीतीने गावांमध्ये ‘जागते रहो’ची आरोळी दिली जायची. पण माण तालुक्यातील वरकुटे मलवडी परिसरातील ग्रामस्थ टेंभू योजनेतून महाबळेश्वरवाडी तलावासाठी पाणी सुटलेल्या व्हॉल्व्हजवळ दिवस-रात्र मुक्काम ठोकून आहेत.

- नितीन काळेलसातारा  - आतापर्यंत चोरांच्या भीतीने गावांमध्ये ‘जागते रहो’ची आरोळी दिली जायची. पण माण तालुक्यातील वरकुटे मलवडी परिसरातील ग्रामस्थ टेंभू योजनेतून महाबळेश्वरवाडी तलावासाठी पाणी सुटलेल्या व्हॉल्व्हजवळ दिवस-रात्र मुक्काम ठोकून आहेत. हे पाणी दुसरीकडे फिरवू नये म्हणून ते रात्रंदिवस पहारा देत आहेत.दुष्काळात भरडणाऱ्या माण तालुक्याच्या वरकुटे मलवडी परिसरातील १६ गावांत पाण्याचं मोठं दुर्भिक्ष; पण आता टेंभू योजनेतून प्रथमच आलेलं पाणी दुष्काळग्रस्तांची तहान भागवणार आहे. सांगली जिल्ह्यातील झरे (ता. आटपाडी) येथे असणाºया जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधून सोडलेले पाणी माळरान, ओढ्यातून खळाळत महाबळेश्वरवाडी तलावाच्या दिशेने प्रथमच निघालंय. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. पण यालाही काही ठिकाणी अडसर येण्याची भीती आहे.झरे गावाच्या जवळच्याच टेंभू योजनेच्या व्हॉल्व्हमधून आटपाडी तालुक्यातील दिघंची (जि. सांगली) गावाला पाणी जात आहे. मात्र, संबंधित गावाला जाणाºया योजनेच्या जलवाहिनीचे काम थोडेच झाले आहे. असे असलेतरी त्या गावाला पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागतो. त्यासाठी शेनवडीमार्गे ओढे, तलावातून संबंधित गावच्या हद्दीत पाणी नेण्याचा लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, हे अंतर खूप असल्याने संबंधित गावच्या तलावात पाणी पोहोचण्यास वेळ लागणार आहे. त्यातच माण तालुक्यातील १६ गावांतूनही पिण्याच्या पाण्यासाठी मागणी होती. त्यामुळे जलवाहिनीचे काम झाल्याने महाबळेश्वरवाडी तलावासाठी पाणी सोडले.सध्या दोन्हीकडे पाणी सुरू आहे. त्यामुळे पुरेशा दाबाने पाणी दोन्हीकडे जात नाही. यासाठी दिघंचीचे ग्रामस्थ व्हॉल्व्ह फिरवून जादा पाणी घेऊन जातील, या भीतीने महाबळेश्वरवाडी, कोरेवाडी, काळचौंडीचे ग्रामस्थ व्हॉल्व्हजवळ दिवसा तसेच रात्रीही मुक्काम ठोकून आहेत.टेंभू कालव्याचा माणमधील १६ गावांना फायदासातारा जिल्ह्याच्या सीमेवरून जाणाºया टेंभू कालव्याच्या माध्यमातून माण तालुक्यातील १६ गावांसाठी फायदा होणार आहे. या गावांसाठी ०.९२ ‘दलघमी’ पाणी मिळत असून, रोटेशनप्रमाणे सोडण्यात येणार आहे. हे पाणी आटपाडी कालव्याच्या किलोमीटर १३ मधून माण तालुक्याला मिळत आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईSatara areaसातारा परिसर