राज्य महिला क्रीडा स्पर्धेत सासवड क्लबला दहा सुवर्ण
By Admin | Updated: November 24, 2014 23:20 IST2014-11-24T21:14:36+5:302014-11-24T23:20:00+5:30
यवतमाळ येथे महिला क्रीडा स्पर्धांमध्ये राज्यस्तरीय २१ सुवर्ण पदकांपैकी

राज्य महिला क्रीडा स्पर्धेत सासवड क्लबला दहा सुवर्ण
साखरवाडी : राज्यस्तरीय महिला क्रीडा स्पर्धांमध्ये सासवड (ता. फलटण) येथील सासवड स्पोर्टस् क्लबने दहा सुवर्ण पदकांसह दैदिप्यमान कामगिरी केली. महाराष्ट्र राज्याच्या क्रिडा व युवक सेवा संचलनालयमार्फत यवतमाळ येथे नुकत्याच झालेल्या महिला क्रीडा स्पर्धांमध्ये राज्यस्तरीय २१ सुवर्ण पदकांपैकी १० सुवर्ण पदके सासवड स्पोर्टस् क्लबच्या महिला खेळाडूंनी पटकावून या स्पर्धेत आले वर्चस्व राखले. यामध्ये दिपिका कोटीयन या खेळाडूने ३०० मीटर धावणे व २०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात सुवर्णपदके मिळविली. आशा झणझणे, चैत्राली गुजर, निता भूजबळ व दिपिका कोटीयन यांनी ४ बाय १०० क्रीडा प्रकारात सुवर्ण पदके प्राप्त केली. तसेच कोमल झणझणे, कोमल भंडलकर, नीता भुजबळ व दिपिका कोटीयन यांनी ४ बाय ४०० मी. रिले स्पर्धेत सुवर्णपदके पटकावली.
या सर्व खेळाडूंची गुजरात येथील गांधीनगर येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली असून या निवडीबद्दल खेळाडूंचे सासवड ग्रामस्थांसह क्रीडाप्रेमींनी कौतुक केले. (वार्ताहर)