सातारा : उंब्रज जवळ एसटी बस उलटली; २५ प्रवासी जखमी
By दीपक शिंदे | Updated: July 6, 2023 17:22 IST2023-07-06T16:48:08+5:302023-07-06T17:22:39+5:30
उंब्रज : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर उत्तर मांड नदीच्या पुलावर चालकाचा एसटी गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी पलटी झाली. या अपघातात ...

सातारा : उंब्रज जवळ एसटी बस उलटली; २५ प्रवासी जखमी
उंब्रज : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर उत्तर मांड नदीच्या पुलावर चालकाचा एसटी गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी पलटी झाली. या अपघातात २० ते २५ प्रवाशी किरकोळ जखमी झाले.
या बाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड कडून सातारा बाजूला निघालेली एसटी गाडी क्रमांक के-ये २८एफ २३५० ही विजापूर-सातारा गाडी उत्तर मांड नदी वर आल्यानंतर गाडीवरील चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे एसटी दुभाजकाला धडकून पटली झाली.
या अपघाताने मोठा आवाज झाल्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना एसटीतून तातडीने बाहेर काढले. यात २० ते २५ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कराड व उंब्रज येथील खासगी दवाखान्यात उपचार करण्यात येत आहेत.