पश्चिम भागात तुरळक पाऊस, महाबळेश्वरला ११ मिलिमीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 18:34 IST2020-09-09T18:30:44+5:302020-09-09T18:34:25+5:30

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक स्वरुपात पाऊस होत असून कोयनेला ४ आणि महाबळेश्वरला ११ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात १०३.३० टीएमसी पाणीसाठा झाला होता.

Sporadic rainfall in western part, 11 mm at Mahabaleshwar | पश्चिम भागात तुरळक पाऊस, महाबळेश्वरला ११ मिलिमीटर

पश्चिम भागात तुरळक पाऊस, महाबळेश्वरला ११ मिलिमीटर

ठळक मुद्दे पश्चिम भागात तुरळक पाऊस, महाबळेश्वरला ११ मिलिमीटर कोयनेत १०३ टीएमसीवर पाणीसाठा

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक स्वरुपात पाऊस होत असून कोयनेला ४ आणि महाबळेश्वरला ११ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात १०३.३० टीएमसी पाणीसाठा झाला होता.

जिल्ह्याच्या अनेक भागात रविवारी दमदार पाऊस झाला. या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये ऊस, सोयाबीनसह भुईमुगाचे अधिक नुकसान झाले. यामुळे शेतकरी कोलमडला आहे. मात्र, रविवारचा हा पाऊस कऱ्हाड , कोरेगाव, साताऱ्यासह पूर्व भागात मोठ्या प्रमाणात पडला. या तुलनेत पश्चिम भागात कमी पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.

सध्या पूर्व भागात पाऊस होत असलातरी पश्चिमेकडे मात्र, तुरळक स्वरुपात पडत आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला अवघा ४ मिलिमीटर पाऊस झाला. तर महाबळेश्वरला ११ मिलिमीटरची नोंद झाली आहे. मात्र, नवजाला पाऊस झाला नाही. सकाळच्या सुमारास कोयना धरणात १०३.३० टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरणात पाण्याची आवक कमी झाली असून गेल्या काही दिवसांपासून विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.

Web Title: Sporadic rainfall in western part, 11 mm at Mahabaleshwar