अध्यात्म्याला जोड माणुसकीची!
By Admin | Updated: December 16, 2014 00:19 IST2014-12-15T21:09:06+5:302014-12-16T00:19:43+5:30
गोंदवळेचं रुग्णालय : गरीब रुग्णांवरील मोफत उपचाराची परंपरा अबाधित

अध्यात्म्याला जोड माणुसकीची!
गोंदवले : ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिराने अध्यात्माला विज्ञानाची जोड देऊन हजारो रुग्णांना जीवदान देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. तो चैतन्य रुग्णालयाच्या माध्यमातून. हे रुग्णालय परिसरातील गरीब व गरजू रुग्णांसाठी संजीवनी ठरत असून, आरोग्य तपासणी व औषधोपचार अगदी विनामूल्य होत असल्याने जनसामान्यांना मोठा आधारच मिळाला आहे, अशा प्रतिक्रीया रुग्णांतून व्यक्त होत आहेत.
गोंदवले बुद्रुक, ता. माण येथील ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा रुग्णसेवेचा वारसा चैतन्य रुग्णालयाच्या माध्यमातून समाधी मंदिर समितीने जोपासला आहे. केवळ रुग्ण तपासणी व औषधोपचार न करता गरजूंवर विनामूल्य शस्त्रक्रिया देखील केल्या जातात. या रुग्णालयात पुणे, मुंबई, सांगली, सातारा, मिरज, आदी शहरी भागातील डॉक्टर्स आपला वेळ देतात. दिलेल्या वेळेनुसार येथे येऊन रुग्ण तपासणी व आॅपरेशन करतात. याठिकाणी निवासी डॉक्टरांची नेमणूकही करण्यात आली आहे. (वार्ताहर)
राज्यात नावारुपाला...
उत्तम प्रकारच्या सेवेमुळे रुग्णालय राज्यभरात नावारूपाला आले आहे. केवळ गोंदवले परिसरातीलच नव्हे, तर राज्यातील कानाकोपऱ्यातील रुग्ण येथील उपचाराचा लाभ घेत आहेत. सर्वोत्तम सेवेमुळेच रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन यावर्षी रुग्णालयाचा आणखी विस्तार करण्यात आला आहे.