शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Satara: परळीच्या महिला उद्योजिकेला राष्ट्रपती कार्यालयाचे निमंत्रण; यशस्वी वाटचालीची घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 17:42 IST

साताऱ्यासाठी अभिमानाची बाब

सातारा : राज्य सरकारच्या ‘उमेद’ अभियानामुळे ग्रामीण भागातील महिलांना आत्मनिर्भर होण्याची मोठी संधी मिळत आहे. याच संधीचा फायदा घेत सातारा जिल्ह्यातील परळी गावातील महिला उद्योजिका अंजना कुंभार यांना थेट राष्ट्रपती कार्यालयाकडून स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रण आले आहे. ही बाब साताऱ्यासाठी अत्यंत अभिमानाची आहे.अंजना कुंभार यांनी सहा वर्षांपूर्वी ‘जय सदगुरू कृपा’ नावाचा बचत गट सुरू केला. या गटात त्यांच्यासह एकूण १२ महिला काम करतात. मातीकाम हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय असल्याने त्यांनी सुमारे दीड वर्षापूर्वी ‘उमेद’ योजनेअंतर्गत अल्प व्याजदरात सहा लाख रुपयांचे कर्ज घेतले. या कर्जाच्या मदतीने त्यांनी मूर्तिकलेच्या व्यवसायाला अधिक बळकटी दिली. सध्या त्यांच्या बचत गटाद्वारे मातीपासून विविध देवदेवतांच्या मूर्ती आणि सुंदर कलाकृती साकारल्या जातात. या कलाकृतींची विविध प्रदर्शनांमध्ये विक्री करून हा गट आर्थिक प्रगती साधत आहे.या यशस्वी वाटचालीची दखल थेट राष्ट्रपती कार्यालयाने घेतली असून, अंजना कुंभार यांना स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता राष्ट्रपती भवनात होणाऱ्या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. साताऱ्यातून या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत. ‘उमेद’ अभियानामुळे ग्रामीण महिलांच्या जीवनात कसा सकारात्मक बदल घडू शकतो, याचे अंजना कुंभार एक उत्तम उदाहरण बनल्या आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या कार्यालयाकडून स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाल्याचा खूप आनंद आहे. राष्ट्रपतींना भेटणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे अविस्मरणीय असेल. या निमंत्रणामुळे आमच्यासारख्या अनेक नवउद्योजिकांना पुढे जाण्यासाठी खरी ‘उमेद’ मिळाली आहे. - अंजना कुंभार, परळी