शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

जिल्ह्यात सवा लाख हेक्टरवर पेरणी, ६० टक्के पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2020 6:10 PM

farmar, sataranews मागील दीड महिन्यापासून रब्बी हंगामातील पेरणीला सुरूवात झाली असलीतरी अद्यापही ६० टक्क्यांच्या वर पेर गेली नाही. त्यामुळे आतापर्यंत ज्वारीची पेरणी ७९ टक्के क्षेत्रावर झाली असून गहू आणि हरभºयाची अत्यल्प आहे. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३० हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात सवा लाख हेक्टरवर पेरणी, ६० टक्के पूर्ण अपेक्षित गती नाही; ज्वारीची ७९ टक्के क्षेत्रावर पेर, गहू, हरभऱ्याची अजुनही अत्यल्प

सातारा : मागील दीड महिन्यापासून रब्बी हंगामातील पेरणीला सुरूवात झाली असलीतरी अद्यापही ६० टक्क्यांच्या वर पेर गेली नाही. त्यामुळे आतापर्यंत ज्वारीची पेरणी ७९ टक्के क्षेत्रावर झाली असून गहू आणि हरभऱ्याची अत्यल्प आहे. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३० हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे.जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख १९ हजार ११९ आहे. यामध्ये सर्वाधिक ज्वारीचे १ लाख ३९ हजार २०० हेक्टर क्षेत्र आहे. गहू ३४ हजार ९७३, मका १२ हजार १७७ तर हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ३० हजार ४८९ हेक्टर आहे. तर करडई, सूर्यफूल, तीळ, जवस यांचे क्षेत्र अत्यल्प आहे.आॅक्टोबर महिना सुरू झाल्यापासून काही तालुक्यात रब्बी हंगामातील ज्वारी पेरणीस सुरूवात झाली होती. पण, त्यानंतर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे पेरणीला ब्रेक लागला. तर काही ठिकाणी ज्वारी पिकाचे नुकसान झाले. परिणामी दुबार पेरणीचे संकटही शेतकऱ्यांवर ओढले. सध्या जिल्ह्यातील पेरणी ६० टक्के झाली आहे. तर १ हजार ३० हजार ५६४ हेक्टरवर पेरा पूर्ण झाला आहे.जिल्ह्यात ज्वारीचे सर्वाधिक सर्वसाधारण क्षेत्र माण तालुक्यात ३२ हजार ५४५ हेक्टर असून त्यानंतर फलटणला २१ हजार ५६४ आणि खटावला २० हजार ८५५ हेक्टर आहे. तसेच कोरेगाव, खंडाळा, वाई, कऱ्हाड , सातारा, जावळी या तालुक्यातही ज्वारीचे क्षेत्र आहे. ज्वारीची आतापर्यंत १ लाख ९ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. गव्हाची आतापर्यंत १७.४० टक्के, मका ४३.५२ आणि हरभऱ्याची ३१.२३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.माण तालुक्यात ८१ टक्के क्षेत्रावर पेरणी...जिल्ह्यात रब्बीचे सर्वाधिक सर्वसाधारण क्षेत्र हे माण तालुक्यात ३९ हजार ८१६ हेक्टर आहे. त्यानंतर फलटणला ३३ हजार, खटाव ३० हजार ११६, कोरेगाव २३ हजार ३३७, सातारा २० हजार ९४९, खंडाळा १८ हजार १७५, कऱ्हाड १५ हजार ४८७, वाई तालुका १५ हजार १५८, पाटण १३ हजार, जावळी ९ हजार ३०७ आणि महाबळेश्वर तालुक्यात ६९८ हेक्टर आहे.

आतापर्यंत सर्वाधिक पेरणी माण तालुक्यात ८१.१२ टक्के झाली आहे. तर पेरणी क्षेत्र ३२ हजार ३०० हेक्टर झाले आहे. त्यानंतर खटावमध्ये ७२.६८ टक्के झाली आहे. तर फलटण ४६, सातारा तालुका ४१, वाई ६३, कऱ्हाड तालुक्यात ५८.६० क्षेत्रावर, पाटण ६०, जावळी तालुका १२.५४, कोरेगावमध्ये ६९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसर