अवघी म्हसवडनगरी गुलालात न्हाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 11:50 PM2019-11-27T23:50:19+5:302019-11-27T23:51:00+5:30

म्हसवड : ‘सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात लाखो भाविकांच्या उपस्थितीत म्हसवड येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या रथावर गुलाल, ...

So far, Mhasavadnagar was bathed in slavery | अवघी म्हसवडनगरी गुलालात न्हाली

अवघी म्हसवडनगरी गुलालात न्हाली

googlenewsNext

म्हसवड : ‘सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात लाखो भाविकांच्या उपस्थितीत म्हसवड येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या रथावर गुलाल, खोबऱ्यांची उधळण करीत रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी लाखो भाविकांनी गर्दी केली होती.
महाराष्ट्रसह आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असणाºया म्हसवड, ता. माण येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या उत्सवमूर्ती सालकरी सुनील कीर्तने यांच्या घरून वाजत-गाजत रथामध्ये बसवण्यात आल्या. रथामध्ये उत्सवमूर्ती बसवल्यानंतर श्रींच्या मूर्तीच्या रथातून मिरवणुकीस प्रारंभ झाला. रथावर बसण्याचा मान राजेमाने घराण्याचा असून, अजितराव राजेमाने, बाळासाहेब राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने, सयाजी राजेमाने, विजयसिंह राजेमाने, गणपतराव राजेमाने, शिवराज राजेमाने, तेजसिंह राजेमाने, दीपसिंह राजेमाने, विश्वजित राजेमाने, सयाजीराजे राजेमाने तसेच बाळासाहेब माने, माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, पोलीस उपविभागीय अधिकारी बी. बी. महामुनी, प्रांत अश्विनी जिरंगे, तहसीलदार बाई माने, तहसीलदार अर्चना पाटील, मुख्याधिकारी चेतना केरुरे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे यांच्या उपस्थित रथोत्सवास प्रारंभ झाला.
श्रींचा विवाह सोहळा एक महिनाभर चालतो. दिवाळी पाडव्यादिवशी घटस्थापना व हळदी समारंभाने या विवाह सोहळ्यास प्रारंभ झाला. त्यानंतर तुळशीविवाह, श्री सिद्धनाथांचा व माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा होऊन बुधवारी लग्नानंतरची वरात म्हणजेच रथोत्सव झाला.
रथ नगरप्रदक्षिणेस सुरुवात झाली. यावेळी भक्तांनी निशाणे, नारळाची तोरणे, पैशांच्या नोटांची तोरणे श्रींना अर्पण केली. अवघी म्हसवडनगरी गुलालात न्हाऊन गेली होती. रथ नवीन नगरपालिका, महात्मा फुले चौक व तसेच पुढे बसस्थानक चौकातून सातारा-पंढरपूर रस्त्यावर ओढत आणला. तेथून पुढे श्री सिद्धनाथ यांच्या बहिणीस मानकऱ्यांच्या हस्ते साडी-चोळी यांचा आहेर करण्यात आला.
म्हसवडचे नगराध्यक्ष तुषार वीरकर, उपनागराध्यक्षा स्नेहल युवराज सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष विलासराव माने, विजय सिन्हा, विजय धट, नितीन दोशी, सुरेश म्हेत्रे, भगवान पिसे, आप्पा पुकळे, सर्जेराव माने, युवराज सूर्यवंशी, बबनदादा वीरकर, दत्तोपंत भागवत, प्रा. विश्वंभर बाबर, अ‍ॅड. निस्सार काझी, अ‍ॅड. नानासो कलढोणे, राजू माने, बाबासाहेब माने आदींनी रथावर गुलाल, खोबºयांची उधळण केली.
यात्रेनिमित्त मंदिरात श्रींच्या दर्शनासाठी भाविकांच्या पहाटेपासूनच दर्शनबारीत भाविकांच्या रांगा लागलेल्या होत्या. यात्रेनिमित्त पाळणे, मौतका कुँवा, नाना-नानी पार्क आदी खेळांच्या साधनाकडे बालगोपाांची मोठी गर्दी होती. विविध मिठाई विक्रते, खेळणी व इतर साहित्य विक्रेत्यांचीही दुकाने भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती.

Web Title: So far, Mhasavadnagar was bathed in slavery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.