शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तुलांसह जिवंत काडतुसांची तस्करी; कऱ्हाडचे चौघे जळगावमध्ये गजाआड, दोघे पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 16:01 IST

जळगाव जिल्ह्यात झालेल्या या कारवाईने कऱ्हाड पोलिसांचीही झोप उडाली

कऱ्हाड : पिस्तुलांसह जिवंत काडतुसांची तस्करी करणाऱ्या कऱ्हाडच्या चौघांना जळगाव जिल्ह्यातील चोपडा पोलिसांनी गजाआड केले. चोपडा ते शिरपूर मार्गावर बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून सहा गावठी बनावटीची पिस्तूल, तीस जिवंत काडतुसे, तसेच महागडी कार असा ३७ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.गणेश ऊर्फ सनी सुनील शिंदे (वय २५, रा. ओगलेवाडी, ता. कऱ्हाड), मोहसीन हनिफ मुजावर (३०, रा. युवराज पाटील चौक, मसूर, ता. कऱ्हाड), रिजवान रज्जाक नदाफ (२३, रा. शिवाजी चौक, मलकापूर-कऱ्हाड) व अक्षय दिलीप पाटील (२८, रा. रविवार पेठ, कऱ्हाड) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत, तर त्यांच्या अन्य दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील चोपडा-शिरपूर मार्गावरून बुधवारी रात्री अवैध शस्त्रांची तस्करी होणार असल्याची माहिती चोपडा शहर पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून रात्री पोलिसांनी या मार्गावर एस्सार पेट्रोल पंपानजीक सापळा रचला. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास संशयित कार या मार्गावरून जाताना पोलिसांना दिसली. पोलिसांनी ती कार अडविली असता संबंधित कारमध्ये चौघेजण आढळले.पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे सहा गावठी बनावटीची पिस्तूल आणि तीस जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी ती जप्त करून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तपास केला असता, कऱ्हाडातील सूरज विष्णू साळुंखे याच्या सांगण्यावरून हे चौघेजण चोपडा येथे पिस्तूल खरेदीसाठी आले असल्याचे पोलिसांना समजले. तसेच मध्य प्रदेश राज्यातील वारला तालुक्यात असलेल्या पारउमर्टी गावातील सागर सरदार नामक व्यक्तीकडून त्यांनी या सहा पिस्तूल व काडतुसे खरेदी केल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चौघांसह कऱ्हाडातील सूरज साळुंखे आणि सागर सरदार या दोघांवर चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

कऱ्हाड पोलिसांची झोप उडाली!

कऱ्हाड शहरासह उपविभागात पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, तसेच गावठी कट्ट्यांच्या तस्करीचे गुन्हे सध्या वाढत आहेत. त्यातच जळगाव जिल्ह्यात झालेल्या या कारवाईने कऱ्हाड पोलिसांचीही झोप उडाली आहे. एकाचवेळी सहा पिस्तूल आणि तीस जिवंत काडतुसे पोलिसांनी कऱ्हाड तालुक्यातील युवकांकडून हस्तगत केली आहेत. त्यामुळे कऱ्हाडात तस्करीचे मोठे जाळे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस