दुकानातून साठ हजारांची रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:47 IST2021-09-07T04:47:45+5:302021-09-07T04:47:45+5:30

सातारा : दुकान मालक ग्राहकांना टेम्पोमध्ये फरशी भरण्यामध्ये व्यस्त असताना इकडे दुकानाच्या गल्ल्यातील तब्बल ६० हजारांची रोकड अज्ञात चोरट्याने ...

Sixty thousand cash lampas from the shop | दुकानातून साठ हजारांची रोकड लंपास

दुकानातून साठ हजारांची रोकड लंपास

सातारा : दुकान मालक ग्राहकांना टेम्पोमध्ये फरशी भरण्यामध्ये व्यस्त असताना इकडे दुकानाच्या गल्ल्यातील तब्बल ६० हजारांची रोकड अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना फलटण पंढरपूर रस्त्यावर दि. ५ रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. याप्रकरणी अज्ञातावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तेजाराम संग्रामराव चाैधरी (वय ३२, रा. भडकमकरनगर, फलटण) यांचे फलटण पंढरपूर रस्त्यावर आशापुरी नावाचे फरशी विक्रीचे दुकान आहे. रविवारी सायंकाळी पाच वजता दुकानात आलेले ग्राहक टेम्पोमध्ये फरशी भरत होते. त्यामुळे दुकानमालक व्यस्त होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्याने दुकानाच्या ड्राॅव्हरमधील ६० हजारांची रोकड हातोहात लांबविली. हा प्रकार काही वेळानंतर त्यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

Web Title: Sixty thousand cash lampas from the shop