चिमुकल्याला बाजूला बसवून आईने प्रियकरासह सज्जनगडावरुन घेतली उडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 07:00 IST2018-11-15T06:58:43+5:302018-11-15T07:00:02+5:30
बुडकेवाडीतीलच नीलेशचे पूनमवर प्रेम होते. चार दिवसांपूर्वी पूनम देवराजला घेऊन थेट गावी आली.

चिमुकल्याला बाजूला बसवून आईने प्रियकरासह सज्जनगडावरुन घेतली उडी
सातारा : सहा वर्षांच्या चिमुकल्याला एका ठिकाणी बसवून प्रेमीयुगुलाने सज्जनडावरील सहाशे फूट दरीत उडी टाकून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी घडली. नीलेश मोरे (२८), पूनम मोरे (२६, दोघेही सध्या रा. मुंबई) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. पूनम हिचा विवाह सात वर्षांपूर्वी अभय मोरे याच्याशी झाला होता. त्यांना देवराज (६) हा मुलगा आहे.
बुडकेवाडीतीलच नीलेशचे पूनमवर प्रेम होते. चार दिवसांपूर्वी पूनम देवराजला घेऊन थेट गावी आली. नीलेश व ती बुधवारी सज्जनगडाला गेले. पूनमने एका ठिकाणी देवराजला बसविले. काही क्षणातच दोघांनीही दरीत उडी टाकली. बराच वेळ आई आली नाही, म्हणून देवराज रडू लागला. आई कड्याकडे गेली आहे, असे सांगितल्यानंतर लोकांनी तिकडे धाव घेतली. दोन तासांनंतर दोघांचेही मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले.
‘लाईव्ह’ आत्महत्या
यवतमाळ : आई-वडिलांना मोबाईलवरून व्हिडीओ कॉल करून आत्महत्येची माहिती देत वणीतील (यवतमाळ) कापड व्यापारी स्वप्निल मेश्राम (३०) याने मंगळवारी रात्री ‘लाईव्ह’ गळफास घेतला. ‘मी आता आत्महत्या करणार आहे,’ असे त्याने सांगितले. पोलीस घरी पोहोचताच, पायाखालचा स्टुल सरकविला. अखेर दार तोडून पोलीस घरात शिरले. तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.