भावाबरोबरच्या भांडणातून बहिणीवर चाकूने प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 17:19 IST2019-12-23T17:18:31+5:302019-12-23T17:19:36+5:30
खंडाळा तालुक्यातील एका गावामध्ये एका युवकाने भावाबरोबर झालेल्या भांडणातून बहिणीवर चाकूने प्राणघातक हल्ला करत गंभीर जखमी केले आहे. यामध्ये बावीस वर्षीय युवती गंभीर जखमी झाली आहे.

भावाबरोबरच्या भांडणातून बहिणीवर चाकूने प्राणघातक हल्ला
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील एका गावामध्ये एका युवकाने भावाबरोबर झालेल्या भांडणातून बहिणीवर चाकूने प्राणघातक हल्ला करत गंभीर जखमी केले आहे. यामध्ये बावीस वर्षीय युवती गंभीर जखमी झाली आहे.
विशेष म्हणजे संबंधित युवतीच्या भावाबरोबर हल्लेखोराचे किरकोळ भांडणे झाली होती त्यातून संबंधित युवकाने हा प्रकार केल्याने पोलीसही चक्रावून गेले आहे. त्यामुळे भावाच्या भांडणात बहिणीला शिक्षा अश्या विचित्र प्रकाराची शिरवळ परिसरात चर्चा सुरु होती.
यामध्ये अमर महादेव नांगरे -पाटील (वय २६ ) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या हल्लेखोर युवकाचे नाव आहे. याप्रकरणी शिरवळ पोलीस स्टेशनला ऍट्रासिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून अधिक तपास फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे हे करीत आहे.