ड्रेसिंग टेबलमध्ये ठेवलेले दागिने लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 12:21 IST2019-04-19T12:13:40+5:302019-04-19T12:21:08+5:30

ड्रेसिंग टेबलमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना साताºयातील गेंडामाळ येथे राहाणाºया अजित इंगळे यांच्या घरात घडली.

Singer kept in the table lined up | ड्रेसिंग टेबलमध्ये ठेवलेले दागिने लांबविले

ड्रेसिंग टेबलमध्ये ठेवलेले दागिने लांबविले

सातारा : ड्रेसिंग टेबलमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना साताºयातील गेंडामाळ येथे राहाणाºया अजित इंगळे यांच्या घरात घडली. इंगळे कुटुंबीय दि. १७ रोजी सकाळी नऊ वाजता काही कामानिमित्त बाहेर गेले होते. संध्याकाळी साडेसातला परत घरी आल्यानंतर त्यांच्या घराचा दरवाजा त्यांना उघडा दिसला. चोरट्याने दरवाजाच्या कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. इंगळे कुटुंबीयांनी घरातील ड्रेसिंग टेबलमध्ये दागिन्यांची पर्स लपवून ठेवली होती. ही पर्स चोरट्यांनी शोधून काढून लंपास केली. त्या पर्समध्ये सुमारे ३० हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने होते. शाहूपुरी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

Web Title: Singer kept in the table lined up