शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
2
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
3
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
4
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
5
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
6
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
7
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
8
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
9
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
12
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
13
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
14
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
15
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
16
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
17
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
18
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
19
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
20
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य

Satara: रंगोत्सवावेळी बंदुकीतून हवेत गोळीबार, तिघांवर गुन्हा; कऱ्हाड तालुक्यातील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 12:51 IST

कऱ्हाड : गावच्या यात्रेवेळी बारा बोअर बंदुकीतून हवेत गोळीबार करण्यात आला. जखीणवाडी (ता. कऱ्हाड) येथे शनिवारी सकाळी ८ वाजेच्या ...

कऱ्हाड : गावच्या यात्रेवेळी बारा बोअर बंदुकीतून हवेत गोळीबार करण्यात आला. जखीणवाडी (ता. कऱ्हाड) येथे शनिवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.योगेश तानाजी थोरात, अधिकराव निवृत्ती पवार, वसंत दाजी पाटील (सर्वजण रा. जाखीणवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड तालुक्यातील जखीणवाडी येथे रंगपंचमीच्या दिवशी रंगोत्सव साजरा केला जातो. यावेळी गावातून बैलगाड्या पळविल्या जातात. या यात्रेला विभागात मोठे महत्त्व आहे. शनिवारी सकाळीही परंपरेनुसार गावात रंगोत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी त्या ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.दरम्यान, उत्सव सुरू असतानाच हवेत गोळीबार झाल्याचा आवाज काही पोलिस कर्मचाऱ्यांना आला. त्यांनी शोध घेतला असता तिघांनी बारा बोअर बंदुकीतून हवेत गोळीबार केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर वरिष्ठ अधिकारीही त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी हवेत गोळीबार करणाऱ्या संशयितांना ताब्यात घेतले. तसेच त्यांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले.त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. तसेच त्यांच्याकडील बारा बोअरची बंदूकही पोलिसांनी हस्तगत केली आहे. याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक महेश पाटील अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFiringगोळीबारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस