होळ,फलटण येथील शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत दहा एकर क्षेत्रातील उसाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 19:10 IST2017-12-02T19:07:28+5:302017-12-02T19:10:34+5:30
जिंती : होळ, ता. फलटण येथील आगीत सुमारे दहा एकर ऊस जळून खाक झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वीजवाहक तारांमुळेच उसाला आग लागल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. होळ येथील शामराव भोसले, संपत भोसले, सुरेश भोसले, गणपत भोसले, लालासो भोसले, मिनीनाथ भोसले, भरत भोसले या शेतकऱ्यांचा उसाला आग लागली.

होळ,फलटण येथील शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत दहा एकर क्षेत्रातील उसाचे नुकसान
जिंती : होळ, ता. फलटण येथील आगीत सुमारे दहा एकर ऊस जळून खाक झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वीजवाहक तारांमुळेच उसाला आग लागल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
होळ येथील शामराव भोसले, संपत भोसले, सुरेश भोसले, गणपत भोसले, लालासो भोसले, मिनीनाथ भोसले, भरत भोसले या शेतकऱ्यांचा उसाला आग लागली. ही घटना शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.
या उसाच्या क्षेत्राजवळून वीजवाहक तारा गेल्या आहेत. वीजवाहक तारांमध्ये घर्षण होऊन ठिणग्या उसाच्या शेतात पडल्या. त्यामुळे उसाने पेट घेतला. यामध्ये उसासह ठिबक संचही जळून खाक झाला. शेतकरी सुरेश सीताराम भोसले यांनी आग शॉर्टसर्किटने लागल्याचे सांगितले.