मृत्यूच्या काही क्षणापूर्वीच महिलेने मागितले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 02:44 PM2020-03-19T14:44:12+5:302020-03-19T14:49:18+5:30

मृत्यूच्या काही क्षणापूर्वीच एका महिलेने पाणी मागितले. मात्र, तोपर्यंत संबंधित महिलेचा मृत्यू झाल्याची घटना वेणेगाव येथे घडली. संबंधित महिलेच्या मृत्यूची बोरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद झाली आहे. ​​​​​​​

Shortly before his death, the woman asked for water | मृत्यूच्या काही क्षणापूर्वीच महिलेने मागितले पाणी

मृत्यूच्या काही क्षणापूर्वीच महिलेने मागितले पाणी

Next
ठळक मुद्देमृत्यूच्या काही क्षणापूर्वीच महिलेने मागितले पाणीबोरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद

सातारा : मृत्यूच्या काही क्षणापूर्वीच एका महिलेने पाणी मागितले. मात्र, तोपर्यंत संबंधित महिलेचा मृत्यू झाल्याची घटना वेणेगाव येथे घडली. संबंधित महिलेच्या मृत्यूची बोरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद झाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वेणेगाव, ता. सातारा येथे एका घराच्या पाठीमागे ओढ्याजवळ पारूबाई माणिक रास्ते (वय ४०) या महिलेला दि. १७ रोजी सायंकाळी भोवळ आली. तिने एका व्यक्तीला पाणी मागितले. मात्र, संबंधिताने फारस लक्ष दिलं नाही. दरम्यान, काहीवेळानंतर महिलेचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. पारूबाई रास्ते यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समोर आले नाही. याबाबत चतुरा संभाजी सोनवणे यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात फियार्दीत म्हटले आहे.

Web Title: Shortly before his death, the woman asked for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.