दुकानाचे कुलूप तोडून ४९ हजारांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 10:48 IST2017-10-23T10:44:52+5:302017-10-23T10:48:13+5:30

कलेढोण, ता. खटाव येथील कापड दुकानाचे कुलूप तोडून ४९ हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. याप्रकरणी वडूज पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

Shop lock of the lock and theft of 49 thousand | दुकानाचे कुलूप तोडून ४९ हजारांची चोरी

दुकानाचे कुलूप तोडून ४९ हजारांची चोरी

ठळक मुद्दे वडूज पोलिस ठाण्यात नोंद तक्रार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दुकानाच्या ड्राव्हरमधून केली ४८ हजार ७५० रुपयांची रोकड लंपास

वडूज, दि . २३ : कलेढोण, ता. खटाव येथील कापड दुकानाचे कुलूप तोडून ४९ हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. याप्रकरणी वडूज पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.


   याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कलेढोण येथील व्यापारी दत्तात्रय विठ्ठल गवरे यांच्या कापड दुकानाचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी कटावणीने तोडून चोरी केली. यावेळी चोरट्यांनी दुकानाच्या ड्राव्हरमधून ४८ हजार ७५० रुपयांची रोकड लंपास केली.

याप्रकरणी वडूज पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, सहायक पोलिस फौजदार गुलाबराव दोलताडे हे तपास करीत आहेत.

Web Title: Shop lock of the lock and theft of 49 thousand