शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

समर्थ मंदिर येथे दुकानाची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 10:28 AM

सातारा येथील समर्थ मंदिर परिसरात असलेल्या दुकानाची दहा ते बाराजणांनी तोडफोड करून लाखो रुपयांचे नुकसान केल्याची घटना सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ठळक मुद्देसमर्थ मंदिर येथे दुकानाची तोडफोडपरिसरातील सीसीटीव्हीत तपास

सातारा : येथील समर्थ मंदिर परिसरात असलेल्या दुकानाची दहा ते बाराजणांनी तोडफोड करून लाखो रुपयांचे नुकसान केल्याची घटना सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.याबाबत अधिक माहिती अशी, प्रशांत मनवे (वय २७, रा. मनवेवाडी, ता. सातारा) याने गेल्या काही महिन्यांपूर्वी समर्थ मंदिर येथे घरगुती वस्तूंचे नवे दुकान सुरू केले आहे. या दुकानामध्ये विजय भोसले (रा. डबेवाडी, ता. सातारा) हा काम करतो. सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास दुकान उघडल्यानंतर हातात हॉकी स्टिक घेऊन दहा ते बारा युवक तेथे आले.

संबंधित युवकांनी दुकानात घुसून दुकानातील साहित्यांची तोडफोड केली. तसेच साहित्य दुकानातून बाहेर फेकले. या प्रकारानंतर संबंधित युवक तेथून पसार झाले. या प्रकाराची माहिती प्रशांत मनवे याला मिळाल्यानंतर त्याने दुकानात धाव घेऊन परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता हल्ला करणारे संबंधित युवक एका ट्रेडिंग कंपनीतील कामगार असल्याचे त्याने ओळखले.

याची पोलिसांना त्याने माहितीही दिली असून, जाबजबाब घेतल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शाहूपुरी पोलिसांनी सुरू केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर