Shocking: Demand for body dryness to give back the lost wallet | धक्कादायक : हरवलेले पाकीट परत देण्यासाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी
धक्कादायक : हरवलेले पाकीट परत देण्यासाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी

ठळक मुद्देहरवलेले पाकीट परत देण्यासाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणीशहर पोलीस ठाण्यात धाव, तक्रार दाखल

सातारा : पतीचे हरवलेले पाकीट परत देण्यासाठी चक्क महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याची खळबळजनक घटना साताऱ्यातील शाहूनगरमध्ये मंगळवारी सायंकाळी घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ४१ वर्षीय पीडित महिलेचा पती दोन दिवसांपूर्वी कामावरून घरी येत असताना वाटेत पाकीट आणि मोबाईल हरविला. त्या मोबाईल पत्नीने फोन केला असता संबंधित व्यक्तीने तुझ्या नवऱ्याचा मोबाईल आणि पाकीट पाहिजे असेल तर माझ्याशी शरीर संबंध ठेव, अशी आश्चर्यचकित करणारी मागणी केली.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिलेने शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन मोबाईल लोकेशनवरून संबंधिताचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.


Web Title: Shocking: Demand for body dryness to give back the lost wallet
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.