शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

सुंदरगडावर शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:12 IST

किल्ल्यावरील खंजीर महाद्वारातील गणपती, हनुमान मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापणा करून पंचगंगा तीर्थ, दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी ...

किल्ल्यावरील खंजीर महाद्वारातील गणपती, हनुमान मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापणा करून पंचगंगा तीर्थ, दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी शिवभक्तांनी छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाच्या घोषणा दिल्या. पारंपरिक संबळ वाद्याच्या निनादात छत्रपती शिवप्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येपासूनच किल्ले सुंदरगडावर शिवज्योती प्रज्वलित करण्यासाठी महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणाहून शिवभक्तांची मांदियाळी सुरू झाली होती. तलवार विहीर व खंजीर महाद्वारसाठी प्रसिद्ध असलेला सुंदरगड शिवजयंतीच्या पूर्व संध्येपासूनच मावळ्यांच्या गर्दीने गजबजून गेला होता. लांबून आलेल्या शिवभक्तांची सुंदरगडावर कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी सुंदरगड संवर्धन समिती, ग्रामस्थांच्या वतीने नियोजन करण्यात आले होते.

शिवजयंतीदिनी प्रांत समयी किल्ल्यावरील खंजीर महाद्वारातील गणपती, हनुमान मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापणा करून पंचगंगा तीर्थ, दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी शिवभक्तांनी शिवघोषणांचा गजर केला. यावेळी पारंपरिक संबळ वाद्याच्या निनादात छत्रपती शिवप्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली. सोहळा संपन्न झाल्यानंतर खंजीर महाद्वारातील गणपती-हनुमान मंदिरात पारंपरिक पद्धतीने छत्रपती शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी शिवकन्या व परिसरातील महिलांनी शिवपाळणा गायला. सुंदरगडावरील हा सोहळा संपन्न करण्यासाठी किल्ले सुंदरगड संवर्धन समिती तसेच ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

फोटो : २०केआरडी०३

कॅप्शन : पाटण तालुक्यातील सुंदरगड-घेरादाते गडावर शिवजन्मोत्सव सोहळा अभुतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.