‘मैं हू डॉन’ गाण्यावर शिवेंद्रसिंहराजेंनी धरला ठेका

By सचिन काकडे | Updated: September 8, 2023 15:34 IST2023-09-08T15:32:45+5:302023-09-08T15:34:17+5:30

सातारा : साताऱ्यातील मल्हारपेठेत गुरुवारी रात्री आयोजित करण्यात आलेला दहीहंडी सोहळा सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला; कारण या सोहळ्याला आमदार ...

Shivendrasinharaje Bhosale danced to the song 'Main Who Don' in the Dahihandi ceremony satara | ‘मैं हू डॉन’ गाण्यावर शिवेंद्रसिंहराजेंनी धरला ठेका

‘मैं हू डॉन’ गाण्यावर शिवेंद्रसिंहराजेंनी धरला ठेका

सातारा : साताऱ्यातील मल्हारपेठेत गुरुवारी रात्री आयोजित करण्यात आलेला दहीहंडी सोहळा सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला; कारण या सोहळ्याला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केवळ हजेरीच लावली नाही तर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ‘मैं हू डॉन’ या गाण्यावर नृत्य करून सर्वांना सुखद धक्काही दिला.

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे समर्थक व माजी नगरसेवक विनोद खंदारे यांच्या वतीने मल्हारपेठेत भव्य-दिव्य दहीहंडी सोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. साहस व कौशल्याचा हा सोहळा पाहण्यासाठी गोविंदा पथकांसह तरुणाईने तुफान गर्दी केली होती. 

या सोहळ्याला आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी हजेरी लावून तरुणाईसह आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले. तसेच कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी डीजेच्या दणदणाटात ‘मैं हू डॉन, राजा माणूस हा दिलदार,’ या गाण्यांवर मनसोक्त नृत्यही केले. त्यांच्या या अनोख्या शैलीला तरुणाईने टाळ्या व शिट्ट्यांनी भरभरून दाद दिली.

Web Title: Shivendrasinharaje Bhosale danced to the song 'Main Who Don' in the Dahihandi ceremony satara