शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
Crime News : धक्कादायक! रात्री उशिरा गावात गोळीबारचा आवाज झाला, जमिनीच्या वादातून दोन भावांना गोळ्या घातल्या
3
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' कामासाठी मिळणार ३० दिवस सुट्टी
4
थायलंडमध्ये भारतीय पर्यटकांचे लाजिरवाने कृत्य; मौजमजेसाठी बारगर्ल बोलविली आणि तिच्या शरीरावरच घेतला आक्षेप...
5
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
6
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
7
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
8
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
9
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
10
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
11
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
12
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
13
विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल
14
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
15
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
16
‘स्लिपिंग प्रिन्स’ला कधीच जाग येणार नाही! सौदीच्या 'झोपलेल्या राजकुमारा'चा प्रवास थांबला
17
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
18
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
19
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल

Satara Politics: भाजप, राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेचीही मोर्चेबांधणी, कराडला महाविकास आघाडीच्या गोटात शांतता

By प्रमोद सुकरे | Updated: June 3, 2025 13:04 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांची गोळा बेरीज सुरू

प्रमोद सुकरे कऱ्हाड: विधानसभा जिंकली पण आता मिनी विधानसभा जिंकण्यासाठी राजकीय पक्षांची जुळवाजुळव सुरू आहे. कऱ्हाड तालुक्यात तर भाजप, राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेच्या नेत्यांनी त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र विरोधी महाविकास आघाडीच्या गोटात मात्र शांतता दिसत आहे.

कऱ्हाड तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र गत विधानसभा निवडणुकीत डॉ. अतुल भोसले यांनी येथे परिवर्तनाचे 'कमळ' फुलवले आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात निश्चितच चांगले वातावरण आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांची गोळा बेरीज सुरू आहे. म्हणून तर काँग्रेसच्या गोटातील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांना भाजपने गळ टाकला असून अनेक जण या गळालाही लागले आहेत. त्यांचे पक्षप्रवेश गेल्या दोन महिन्यात वेळोवेळी झाले आहेत.

तर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने एकच मोठा डाव मारला . काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अँड.उदयसिंह पाटील यांनाच पक्षप्रवेश देत तालुक्यातील राजकारणात मोठा भूकंप घडवला.

एकनाथ शिंदे शिवसेना गटाने देखील कराड शहर व तालुक्याला मोठा विकास निधी दिला असून त्यांचे शिलेदारही कामाला लागले आहेत. नुकताच पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थित कराडला एक मेळावा झाला. त्या मेळाव्यातही अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

सत्तेत असणाऱ्या महायुतीतील तिन्ही पक्ष आपली पक्ष संघटना वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. या उलट महाविकास आघाडीतील घटक पक्ष मात्र शांत दिसत आहेत.

पृथ्वीराज चव्हाण म्हणतात ..

भाजपने ईडी, सीबीआय ची भीती दाखवून काँग्रेसच्या नेत्यांना गळाला लावले. भाजप वाढवण्यासाठी त्यांना काँग्रेसचीच मदत घ्यावी लागते आहे. त्यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच क्लीन चीट देत पक्षात घेतले आहे. काँग्रेसमुक्त भारत करता करता त्यांची भाजप काँग्रेस युक्त झाली आहे. पण अशाने काँग्रेस कधीही संपणार नाही. असा हल्लाबोल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकत्याच झालेल्या एका काँग्रेसच्या मेळाव्यात केला.

अतुल भोसले म्हणतात..त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या पक्षात थांबायला तयार नाहीत. काँग्रेसमध्ये आपल्याला भविष्य नाही हे त्यांना पटू लागल्यामुळेच ते भाजपमध्ये दाखल होत आहेत. मात्र ३९ हजार मतांनी झालेला पराभव आणि त्यानंतर काँग्रेस पक्षात सुरू असणारी गळती यामुळे अस्वस्थ होऊन पृथ्वीराज चव्हाण वक्तव्य करीत आहेत. तुम्ही जेव्हा ईव्हीएम मशीनद्वारे निवडून आला तेव्हा ते बरोबर होते आणि पराभव झाल्यावर मात्र तुम्ही कोर्टात जाता ही गोष्ट न पटणारी आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी आता पराभव पचवायची सवय करावी.अशी उपरोधिक टीका भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी एका कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना  केली आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अँड. उदयसिंह पाटील यांचा पक्षप्रवेश करीत धमाका केला. पण उदयसिंह पाटलांच्या घड्याळाला अजून पूर्ण चावी मिळाल्याचे दिसत नाही‌. कारण एड. उदयसिंह पाटील यांनी पक्षप्रवेशानंतर ज्या पद्धतीने मतदार संघात काम करणे त्यांच्याच कार्यकर्त्यांना अपेक्षित होते तसे काम होत नसल्याची खंत त्यांचेच कार्यकर्ते खासगीत व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडPoliticsराजकारणMahayutiमहायुतीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना