Shiv Jayanti celebrations at the growing Shivshahi Pratishthan | वाढेतील शिवशाही प्रतिष्ठान येथे शिवजयंती सोहळा

वाढेतील शिवशाही प्रतिष्ठान येथे शिवजयंती सोहळा

सातारा : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते हैबतबापू नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवशाही प्रतिष्ठानच्या माध्यमातून भव्य शिवजयंती सोहळा वाढे येथे उत्साहात झाला.

यावेळी प्रशांत नलावडे, भरत नलावडे, अनिल नलावडे, वाढे ग्रामपंचायतीचे सदस्य ज्ञानेश्वर नलावडे, गणेश नलावडे, दत्ता नलावडे, विशाल नलावडे, अजित नलावडे, जितेंद्र नलावडे, मनोज नलावडे, शालिवान नलावडे, श्रीनाथ नलावडे, श्रीधर नलावडे, निखील नलावडे, निशांत नलावडे, संकेत नलावडे, मनोज भगत, प्रतीक नलावडे, सॅन्डी नलावडे, सागर नलावडे, अमित नलावडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष सागर नलावडे, तुषार जाधव, अनिकेत नलावडे, उत्कर्ष नलावडे, सुजित जगताप, वैष्णव नलावडे, प्रसाद घाडगे, प्रशांत जाधव, अजिंक्य कदम, महेश कदम यांच्या उपस्थितीत भव्य शाही मिरवणुकीने शिवजयंती सोहळा पार पडला.

यावेळी सातारा तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सजन हंकारे, हवालदार राजू मुलाणी, पोलीस नाईक दीपक पोळ आदींचा सत्कार करण्यात आला. शिवशाही प्रतिष्ठानचे अध्यक्ष व शिवसेना सातारा तालुकाप्रमुख दत्तात्रय हैबतराव नलावडे यांच्या वतीने शिवप्रतिमा देऊन मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मिथुन माने यांनी केले. मनोज नलावडे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले.

फोटोनेम : सातारा तालुक्यातील वाढे येथे शिवजयंती सोहळ्यात पोलीस नाईक दीपक पोळ यांचा सत्कार करण्यात आला.

फोटो नेम : 22पोळ

Web Title: Shiv Jayanti celebrations at the growing Shivshahi Pratishthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.