हणबरवाडी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी शेडगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:46 IST2021-09-08T04:46:26+5:302021-09-08T04:46:26+5:30

मसूर : हणबरवाडी (ता. कऱ्हाड) येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी बळीराम श्रीरंग शेडगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ...

Shedge as the Chairman of the Hanbarwadi Dispute Resolution Committee | हणबरवाडी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी शेडगे

हणबरवाडी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी शेडगे

मसूर : हणबरवाडी (ता. कऱ्हाड) येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी बळीराम श्रीरंग शेडगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडीबद्दल बळीराम शेडगे यांचा उपसरपंच प्रकाश कुंभार, हणमंत शेडगे, भानुदास निगडे, माजी सरपंच अरुण शेडगे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी बळीराम शेडगे म्हणाले, ‘हणबरवाडी गावाला धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा आहे. आपले गाव तंटामुक्त व निर्मलग्राम असून, आपल्यावर टाकलेली जबाबदारी सर्वांना बरोबर घेऊन प्रामाणिक व नि:पक्षपातीपणे पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्या गावात तंटा होऊ नये यासाठी प्रयत्न राहतील.’

याप्रसंगी प्रकाश शेडगे, रामचंद्र पवार, सुनील घाडगे, शिवाजी शेडगे, विनायक शेडगे, जनार्दन घाडगे, संभाजी शेडगे, सतीश घाडगे, रमेश पवार, गोरख देसाई, प्रकाश पवार, सुनील पंदुगडे, महेश शेडगे, मधुकर शेडगे, तानाजी ढेरे, श्रीधर शेडगे, संग्राम घाडगे, संदेश शेडगे उपस्थित होते.

फोटो ०७मसूर-हणबरवाडी

हणबरवाडी येथे बळीराम शेडगे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रकाश कुंभार, हणमंत शेडगे, भानुदास निगडे, अरुण शेडगे उपस्थित होते.

Web Title: Shedge as the Chairman of the Hanbarwadi Dispute Resolution Committee