शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: शरद पवार-शेखर गोरे भेट, सकारात्मक चर्चा; पण, कोणताही निर्णय जाहीर नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 11:01 IST

Madha Lok Sabha Constituency: माढा लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय गाठीभेटी वाढल्या असून, उध्दवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शेखर गोरे यांनी बारामतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. पण, गोरे यांनी कोणताही निर्णय जाहीर केला नाही.

- दीपक शिंदेसातारा - माढा लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय गाठीभेटी वाढल्या असून, उध्दवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शेखर गोरे यांनी बारामतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. पण, गोरे यांनी कोणताही निर्णय जाहीर केला नाही. आता पवार आणि उध्दव ठाकरे यांच्यातील बैठकीत गोरे यांच्या मागण्यांबाबत विचार करण्यात येणार आहे. त्यानंतरच गोरे निर्णय जाहीर करणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.

माढा मतदारसंघातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापू लागले आहे. उमेदवार राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन पाठिंब्याबाबत चाचपणी करत आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते - पाटील यांनी आठ दिवसांपूर्वीच शेखर गोरे यांची भेट घेतली होती, तर दोन दिवसांपूर्वी भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक - निंबाळकर यांनीही गोरे यांची भेट घेऊन चर्चा केली. पण, गोरे यांनी भूमिका स्पष्ट केली नाही. त्यातच गोरे महाविकास आघाडीत असले तरी माणच्या राजकारणात त्यांच्यापुढे अडचणी उभ्या केल्या जात आहेत. राष्ट्रवादीबद्दल त्यांच्यापुढे काही प्रश्न आहेत. या प्रश्नांची सोडवणूक झाल्याशिवाय प्रचारात उतरणार नाही, असे त्यांनीच स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी बारामतीत शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.

सोमवारी रात्री पवार आणि गोरे यांच्यात सुमारे एक तासभर चर्चा झाली. यामध्ये माढा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणे, ताकद देणे, याविषयी चर्चा झाली. तसेच माण तालुक्याच्या राजकारणावरही भाष्य झाले. ही चर्चा सकारात्मक झाली तरी माणमधील प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत लोकसभा प्रचाराचा निर्णय घेणार नाही, असे गोरे यांनी ठरविले आहे.

बारामती येथे शरद पवार यांच्याबरोबर बैठक झाली. यामध्ये पाठीमागील काही विषय होते. या भेटीत माझे म्हणणे मांडले आहे. भेटीत सकारात्मक चर्चा झाली आहे. तरीही मुंबईत शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बैठक होईल. त्यातून आणखी मार्ग निघेल. त्यानंतर प्रचाराचा निर्णय घेऊ.- शेखर गोरे, जिल्हा संपर्कप्रमुख उध्दवसेना

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४madha-pcमाढाSharad Pawarशरद पवारShekhar Goreशेखर गोरेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४