शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याच्या राजकारणावरील शरद पवारांचा प्रभाव संपेल - केंद्रीय राज्यमंत्री सोम प्रकाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 12:35 IST

काँग्रेस नेस्तानबूत झाली असून इतर प्रादेशिक पक्षही संपतील आणि भाजपचा प्रभाव वाढत जाईल

सातारा : राजकारण बदलत आहे, त्याप्रमाणे राजकारणावरील व्यक्तींचे प्रभावही बदलत जातात. सातारा जिल्ह्यावरील खासदार शरद पवार यांचाही प्रभाव संपून जाईल. तसेच काँग्रेस नेस्तानबूत झाली असून इतर प्रादेशिक पक्षही संपतील आणि भाजपचा प्रभाव वाढत जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी केले.साताऱ्यात पत्रकारांशी ते बोलत होते. त्यानंतर त्यांचा उंब्रज येथेही मेळावा झाला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, डॉ. अतुल भोसले, धैर्यशील कदम आदी उपस्थित होते.मंत्री सोम प्रकाश म्हणाले, भाजप सरकारचा असलेला प्रभाव आणि येणाऱ्या निवडणुकांसाठी काय तयारी करावी लागेल, याची माहिती घेतली आहे. यावरून जिल्ह्यातील भाजपचा प्रभाव वाढत चालला असून यापूर्वी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हटला जाणारा सातारा आता शरद पवारांच्या प्रभावापासून लांब जाईल. भाजपला येथे चांगली संधी असून पक्षाच्या वाढीसाठी सर्वांचीच मदत होण्याची आवश्यकता आहे. आगामी काळात भारतात ३२ मोठी औद्योगिक केंद्रे निर्माण केली जाणार आहेत. त्यातील तीन महाराष्ट्रात आणि एक साताऱ्यात आहे.उंब्रज येथील मेळाव्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे म्हणाले, तत्कालीन सहकारमंत्री दमबाजीचे राजकारण करीत होते. सत्तेचा दुरुपयोग केला जात होता. अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांना जेलमध्ये बसविण्याचे काम केले असल्याचा आरोप करून, येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत सातारा जिल्ह्याचा खासदार भाजपचा असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

साताऱ्याच्या लोकसभेच्या उमेदवाराबाबत मौन

सातारा लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवार निश्चित केला आहे का, तसेच खासदार उदयनराजे यांना संधी दिली जाणार का, असे विचारले असता मंत्री सोम प्रकाश यांनी सध्या सुरू असलेला दौरा पक्षवाढ आणि पक्ष बळकटीकरणाच्या दृष्टीने आहे. लोकसभा निवडणुकीला उमेदवार कोण असेल हे पार्लमेंटरी बॉडी ठरवणार आहे, असे स्पष्ट केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा