शरद पवार सहकुटुंब महाबळेश्वरात मुक्कामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 11:49 IST2025-03-03T11:48:43+5:302025-03-03T11:49:30+5:30

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सहकुटुंब महाबळेश्वर येथे मुक्कामी आले आहेत. याठिकाणी त्यांचा किमान चार ते ...

Sharad Pawar family stay in Mahabaleshwar | शरद पवार सहकुटुंब महाबळेश्वरात मुक्कामी

शरद पवार सहकुटुंब महाबळेश्वरात मुक्कामी

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सहकुटुंब महाबळेश्वर येथे मुक्कामी आले आहेत. याठिकाणी त्यांचा किमान चार ते पाच दिवस मुक्काम असून, ते विश्रांतीसाठी आले असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

शरद पवार हे विश्रांतीसाठी आले असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांकडून जुळवाजुळव सुरू आहे. सातारा जिल्ह्याशी खासदार पवार यांचे ऋणानुबंध असल्याने जिल्ह्यातील नेते त्यांच्या भेटीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Sharad Pawar family stay in Mahabaleshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.