शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

हॉटेलच्या मॅनेजरवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या सात युवकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 16:13 IST

हॉटेलमध्ये झालेल्या वादानंतर हॉटेलचे व्यवस्थापक मनिंदर कृष्णदेव वाघमळे (रा. कण्हेर, ता. सातारा) यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या सातजणांना सातारा तालुका पोलिसांनी अटक केली. त्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.

ठळक मुद्देहॉटेलच्या मॅनेजरवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या सात युवकांना अटककण्हेर येथील प्रकार; सातारा तालुका पोलिसांची कारवाई

सातारा : हॉटेलमध्ये झालेल्या वादानंतर हॉटेलचे व्यवस्थापक मनिंदर कृष्णदेव वाघमळे (रा. कण्हेर, ता. सातारा) यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या सातजणांना सातारा तालुका पोलिसांनी अटक केली. त्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.प्रतिक दीपक येवले, आकाश संपत बोतालजी, ऋषीकेश विजय बुधावले (सर्व रा. कोरेगाव) कुणाल विश्वास मोरे (रा. आंबेदरे ,ता.सातारा), प्रकाश सुनिल शिवदास (रा. संगम माहुली, सातारा) यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी, कण्हेर, ता. सातारा येथील हॉटेल साईसागरमध्ये गुरूवार, दि.९ रोजी रात्री संशयित युवक वाढदिवस साजरा करून जेवण करण्यासाठी तेथे गेले होते. त्यावेळी त्यांनी मोठ मोठ्याने ओरडण्यास सुरूवात केली. तसेच त्या युवकांनी वेटरला शिवीगाळ केली होती. ही बाब वेटरने व्यवस्थापक वाघमळे यांना सांगितली.त्यामुळे युवकांना गोंधळ करून नका, असे वाघमळे यांनी सांगितले.

यातील एकाने वाघमळे यांना जोराचा धक्का दिला. मात्र, नंतर वेटरच्या मदतीने त्यांना हॉटेलमधून बाहेर काढण्यात आल्याने चिडलेल्या संशयितांनी वाघमळे यांना चाकूने भोकसण्याचा प्रयत्न केला. यात वाघमळे जखमी झाले होते. घटनेनंतर पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी तपास गतिमान करून गुन्हे प्रकटीकरण शाखेला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.

संबंधित युवकांची ओळख पटविणे पोलिसांसमोर आव्हान होते. खबऱ्यामार्फत यातील एका युवकाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर एका-एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी केवळ चार दिवसांत जीवघेणा हल्ल्याचा छडा लावला. ही कारवाई पोलीस हवालदार दादा परिहार, राजेंद्र वंजारी, सुजीत भोसले, महेंद्र पाटोळे, सनी आवटे, सागर निकम, संदीप कुंभार, रमेश चव्हाण, नितीराज थोरात, विश्वनाथ आंब्राळे यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर