शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

‘सात’ताऱ्यांची शाही मिरवणूक ऐतिहासिक कामगिरी : खेलो इंडिया स्पर्धेत पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 23:23 IST

बालेवाडी (पुणे) येथे नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्स या राष्ट्रीय स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील सात खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य, कांस्य पदकाला गवसणी घालून ऐतिहासिक कामगिरी केली. या खेळाडूंची सातारकरांनी शाहूनगरीत सोमवारी

ठळक मुद्देखेलो इंडिया स्पर्धेत पदकांची कमाई करणाºया खेळाडूंचा गौरव

सातारा : बालेवाडी (पुणे) येथे नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्स या राष्ट्रीय स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील सात खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य, कांस्य पदकाला गवसणी घालून ऐतिहासिक कामगिरी केली. या खेळाडूंची सातारकरांनी शाहूनगरीत सोमवारी शाही मिरवणूक काढून त्यांचा गौरव केला.

खेलो इंडिया युथ गेम्समध्ये स्पर्धेत खर्शी येथील सुदेष्णा शिवणकर हिने १०० मीटर धावणेत सुवर्णपदक पटकाविले. तसेच १०० मीटरचे अंतर १२.४८ सेकंदात पार करत सुवर्णपदक पटकावले आहे. बॅडमिंटनमध्ये आर्या देशपांडे हिने तिची सहकारी अनन्या फडके हिच्या साथीने २१-० अशी खेळी करत सुवर्णपदक पटकाविले.

वेटलिफ्टिंगमध्ये वैष्णवी पवार हिने ८१ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळविले. तिने स्नॅचमध्ये ५४ किलो तर क्लीन व जर्कमध्ये ६४ असे एकूण ११४ किलो वजन उचलले. तर रहिमतपूरच्या तन्वीन तांबोळी हिने २१ वर्षांखालील व ७० किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक पटकावले. तर वेटलिफ्टिंगमध्ये मयुरी देवरे हिने ७६ किलो, स्नॅचमध्ये ७९ किलो, क्लीन व जर्कमध्ये ९७ किलोत रौप्यपदक मिळविले. म्हसवडच्या आदिती बुगडने ३९.०८ मीटर थळीफेक टाकून कांस्यपदक पटकाविले. वेटलिफ्टिंगमध्ये वैष्णवी पवार, आर्यन वर्णेकरने जलतरण क्रीडा प्रकारात पदकांची कमाई केली.

या सर्व खेळांडूनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल सातारकरांनी सोमवारी त्यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन केले होते. राजवाडा परिसरातून कमानी हौद, कमानी हौद ते शेटे-चौक-राजवाडा अशी ढोल-ताशांच्या गजरात मिळवणूक काढली.यावेळी सर्व सुदेष्णा शिवणकर व आर्या देशपांडे या दोघांची रथातून मिरवणूक काढली. वैष्णवी पवार, तन्वीन तांबोळी, आदिती बुगड, वैष्णवी पवार, आर्यन वर्णेकर यांची घोड्यांवरून मिरवणूक काढण्यात आली. राजवाडा परिसरात विजेत्या खेळाडूंना सातारकरांच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी विविध शाळांचे विद्यार्थी व साताराकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKhelo Indiaखेलो इंडिया