फलटणचे दिगंबर आगवणे यांच्यासह सात जणांना मोक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 23:37 IST2023-01-10T23:35:51+5:302023-01-10T23:37:03+5:30
फलटण तालुक्यातील गिरवी येथील आयुर उद्योग समूहाचे प्रमुख दिगंबर आगवणे यांच्यासह सातजणांवर मोक्का

फलटणचे दिगंबर आगवणे यांच्यासह सात जणांना मोक्का
सातारा:
फलटण तालुक्यातील गिरवी येथील आयुर उद्योग समूहाचे प्रमुख दिगंबर आगवणे यांच्यासह सातजणांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मोक्का प्रस्तावास मंजुरी दिली आहे.
दिगंबर रोहिदास आगवणे (रा. गिरवी), आदिनाथ काशीनाथ मोटे (रा. सरडे, ता. फलटण), नितीन कालीदास करे रा. वाठारस्टेशन, ता. कोरेगाव), सागर गायकवाड रा. आसू ता. फलटण), अनिल रामचंद्र सरक रा. नांदल, ता. फलटण) यांच्यासह दोन महिलांचा कारवाई झालेल्यामध्ये समावेश आहे.
दिगंबर आगवणे यांच्यासह अन्य सात जणांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये ही कारवाई झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.