स्वकर्तृत्वाने लेखापरीक्षणाचे अध्यक्षपद मिळविले : क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:53 IST2021-02-25T04:53:15+5:302021-02-25T04:53:15+5:30

धामणेर : ‘संत गाडगेबाबांच्या पुण्यभूमीमध्ये धामणेर गावांमधून शहाजी क्षीरसागर यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने राज्यस्तरीय लेखापरीक्षण समितीचे अध्यक्षपद मिळविले असून, ...

Selfishness won the chairmanship of audit: Kshirsagar | स्वकर्तृत्वाने लेखापरीक्षणाचे अध्यक्षपद मिळविले : क्षीरसागर

स्वकर्तृत्वाने लेखापरीक्षणाचे अध्यक्षपद मिळविले : क्षीरसागर

धामणेर : ‘संत गाडगेबाबांच्या पुण्यभूमीमध्ये धामणेर गावांमधून शहाजी क्षीरसागर यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने राज्यस्तरीय लेखापरीक्षण समितीचे अध्यक्षपद मिळविले असून, अशाप्रकारचे व्यक्तिमत्त्व गावात तयार होणे म्हणजे गावकऱ्यांच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे,’ असे उद्गगार कात्रज दूध डेअरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विवेक क्षीरसागर यांनी काढले.

धामणेर (ता. कोरेगाव) येथे आदर्श सरपंच शहाजी क्षीरसागर यांची राज्यस्तरीय लेखापरीक्षण समितीच्या अध्यक्षपदावर निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर माजी उपसरपंच उत्तमराव क्षीरसागर, जनता बँकेचे संचालक आनंदराव कणसे, बाळकृष्ण क्षीरसागर, संगीता क्षीरसागर, भागवत घाडगे, जयकुमार घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

शहाजी क्षीरसागर म्हणाले, ‘राज्यस्तरावर लेखापरीक्षण समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर माझ्या धामनेरवासीयांनी इतर नेत्यांच्या प्रमाणेच माझे स्वागत केले, त्यामुळे मी भारावून गेलो आणि अशाप्रकारचा पुण्याचा क्षण आयुष्यामध्ये येणे यासारखे दुसरे कोणतेच भाग्य नाही, असे मी समजतो.

प्रास्ताविक अशोक देसाई यांनी केले. सूत्रसंचालन व आभार ग्रामपंचायत सदस्य सुनील क्षीरसागर यांनी मानले. (वा.प्र.)

२४धामणेर

फोटो : राज्यस्तरीय लेखापरीक्षण समितीच्या अध्यक्षपदी शहाजी क्षीरसागर यांची निवड झाल्याबद्दल डॉ. विवेक क्षीरसागर यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला.

Web Title: Selfishness won the chairmanship of audit: Kshirsagar