शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
4
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
5
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
6
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
7
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
8
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
9
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
10
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
11
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
12
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
13
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
14
Navi Mumbai: तीन मित्रांच्या जीवावर बेतली पावसाळी सहल 
15
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
16
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
17
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
18
IPO: 'स्वप्न विकणारे' आयपीओ ठरले फसवे, रिटर्न्समध्ये गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग !
19
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
20
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली

स्वाभिमानीचे ऊसतोड बंद आंदोलन चिघळले, साताऱ्यातील इंदोलीत ऊस ट्रॅक्टर पेटवला

By प्रमोद सुकरे | Updated: November 17, 2022 11:48 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्याला संशयित म्हणून घेतले ताब्यात

कराड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज, दि. १७ व उद्या १८ नोव्हेंबरला दोन दिवसाचे राज्यभर ऊसतोड बंद आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन कराड तालुक्यात चिघळले असून इंदोली येथे काल, बुधवारी रात्री उशिरा अज्ञाताने ऊस वाहतूक करणारा एक ऊस ट्रॅक्टर पेटवून दिला. त्यामुळे पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्याला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, साखर कारखानदारांनी विना कपात एकरकमी एफ.आर.पी द्यावी. हंगाम संपल्यावर ३५० रुपये द्यावे अशी स्वाभिमानीची मागणी आहे. मात्र यामागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज, दि. १७ व उद्या १८ नोव्हेंबरला राज्यभर लाक्षणिक ऊसतोड बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. या २ दिवसात शेतकऱ्यांनी ऊसतोडी करु नये. रस्त्यावरून ऊस वाहतूक करु नये. आंदोलनाला सहकार्य करावे. असे आवाहन संघटनेने केले होते.या आंदोलनाला अनेक ऊसतोड वाहतूक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नेहमी सारखा संघर्ष होणार नाही असा विश्वासही व्यक्त केला होता. पण बुधवारी रात्री इंदोली येथील उसाने भरलेला ट्रॅक्टर अज्ञाताने पेटवून दिल्याने हे आंदोलन चिघळले आहे. त्याचबरोबर पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दादासो यादव यांना या बाबत ताब्यात घेतले असल्याचे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. दरम्यान यामुळे कराड तालुक्यातील वातावरण तापले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाSugar factoryसाखर कारखानेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस