सातारा झेडपी भरतीचा दुसरा टप्पा १५ ऑक्टोबरपासून, पहिल्या टप्प्यात आठ संवर्गासाठी झाली परीक्षा 

By नितीन काळेल | Published: October 13, 2023 06:47 PM2023-10-13T18:47:24+5:302023-10-13T18:47:41+5:30

सातारा : सातारा जिल्हा परिषद वर्ग तीनची नोकर भरती सुरू असून पहिल्या टप्प्यातील शेवटची परीक्षा लघुलेखक आणि लेखाच्या कनिष्ठ ...

Second Phase of Satara ZP Recruitment from 15th October | सातारा झेडपी भरतीचा दुसरा टप्पा १५ ऑक्टोबरपासून, पहिल्या टप्प्यात आठ संवर्गासाठी झाली परीक्षा 

सातारा झेडपी भरतीचा दुसरा टप्पा १५ ऑक्टोबरपासून, पहिल्या टप्प्यात आठ संवर्गासाठी झाली परीक्षा 

सातारा : सातारा जिल्हा परिषद वर्ग तीनची नोकर भरती सुरू असून पहिल्या टप्प्यातील शेवटची परीक्षा लघुलेखक आणि लेखाच्या कनिष्ठ सहाय्यकांची झाली. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील आठ संवर्गाच्या या परीक्षेनंतर आता दि. १५ आॅक्टोबरपासून परीक्षेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. यासाठीही जिल्ह्यातील विविध केंद्रावर परीक्षा होणार आहे.

राज्य शासनाने जिल्हा परिषदेमधील वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली आहे. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेतील रिक्त ९७२ जागांसाठी नोकर भरती होत आहे. यासाठी विविध विभागातील २१ संवर्गातील पदे भरण्यात येणार आहेत. सातारा जिल्हा परिषदेतील नोकरीसाठी ७४ हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यामधील पहिल्या टप्प्यात ८ संवर्गासाठी परीक्षा झाली. यामध्ये रिंगमन (दोरखंडवाला), लेखा वरिष्ठ सहाय्यक, सांख्यिक विस्तार अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक पदासाठी परीक्षा झाली. तर दि. ११ रोजी तीन संवर्गासाठी परीक्षा झाली. 

यामधील लघुलेखक निम्नश्रेणीसाठी ११ उमेदवारांनी अर्ज भरला होता. यातील एकजण गैरहजर राहिल्याने १० जण परीक्षेसाठी उपस्थित होते. लघुलेखक उच्चश्रेणीतही ११ जण अर्जदार होते. त्यातील आठजणांनी परीक्षा दिली. तर तिघेजण अनुपस्थित राहिले. तर लेखाच्या कनिष्ठ सहाय्यक संवर्गासाठी ३१० उमेदवारांनी अर्ज भरला होता. त्यातील ५८ गैरहजर राहिल्याने २५२ जणांनी परीक्षा दिली. आता या नाेकर भरतीचा दुसरा टप्पा दि. १५ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. १५ आणि १७ आॅक्टोबरला परीक्षा होणार आहे. जिल्ह्यातील सातारा शहरात दोन आणि कऱ्हाडमधील एका केंद्रावर या परीक्षा होत आहेत.

Web Title: Second Phase of Satara ZP Recruitment from 15th October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.