शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Satara: मार्डीत शेततळ्यात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू, पालकांकडून संशय व्यक्त; घटनेचा तपास करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 13:39 IST

पळशी : मार्डी, ता. माण येथील ९ वर्षांच्या शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी तीनच्या ...

पळशी : मार्डी, ता. माण येथील ९ वर्षांच्या शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास जोतिबा परिसरात उघडकीस आली. या घटनेनंतर मृत मुलाच्या पालकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून, या घटनेचा सखोल तपास करावा, अशी मागणी दहिवडी पोलिसांकडे केली आहे. शंभूराज शशिकांत राजमाने (रा. मार्डी) असे शेततळ्यात बुडून मृत्यृ झालेल्या मुलाचे नाव आहे.याबाबत माहिती अशी की, मार्डी येथील शंभूराज राजमाने हा तबला व पेटी वाजवण्याच्या खासगी क्लासला नेहमीप्रमाणे मंगळवार, दि. १५ रोजी दुपारी सायकल घेऊन गेला होता. तो रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही. त्यामुळे पालकांनी क्लासमध्ये व क्लासच्या इतर मुलांकडे चौकशी केली असता तो क्लासला आला नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे घाबरलेल्या पालकांनी नातेवाइकांच्या मदतीने त्याची इतरत्र शोधाशोध सुरू केला.रात्री उशिरा क्लासशेजारील नलवडे यांच्या घरामागे असणाऱ्या शेततळ्याशेजारीच त्याची सायकल व चप्पल पडल्याचे नातेवाइकांना दिसून आले. नातेवाइकांनी शोध घेतला असता शेततळ्यात शंभूराजचा मृतदेह आढळला. या घटनेची नोंद दहिवडी पोलिसांत झाली आहे.

‘तो’ कोणाला दिसला कसा नाही..तबल्याच्या क्लासला मोजकीच मुले जात असतात. त्यात शंभूराज हा सायकल घेऊन आला असताना क्लास घेणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना तो कसा दिसला नाही. या बाबतीत मात्र मार्डी ग्रामस्थ शंका उपस्थित करत आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी मृत मुलाचे पालक शशिकांत राजमाने यांनी दहिवडी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे.

आई-वडिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश..शंभूराज हा अत्यंत हुशार आणि मनमिळावू असल्यामुळे तो आई- वडील, नातेवाईक व गावकऱ्यांचा अत्यंत लाडका होता. त्याच्या जाण्याने गावकरी व आई- वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आई-वडिलांचा आक्रोश पाहताना उपस्थितांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यूPoliceपोलिस