सातारकर चुकचुकले, बिचुकलेंचे नाव कसे हो चुकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 16:27 IST2020-12-01T16:25:08+5:302020-12-01T16:27:20+5:30
abhijeet bichukale, Vidhan Parishad Election, Satara area पुणे पदवीधर मतदार संघातील उमेदवार अभिजीत बिचुकले यांचे पदवीधरच्या मतदार यादीतुन नाव गायब असल्याचा प्रकार मतदानादिवशी उघडकीस आला. भारतीय जनता पार्टीने हे कुभांड रचल्याचा आरोप देखील बिचुकले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

सातारकर चुकचुकले, बिचुकलेंचे नाव कसे हो चुकले
सातारा : पुणे पदवीधर मतदार संघातील उमेदवार अभिजीत बिचुकले यांचे पदवीधरच्या मतदार यादीतुन नाव गायब असल्याचा प्रकार मतदानादिवशी उघडकीस आला. भारतीय जनता पार्टीने हे कुभांड रचल्याचा आरोप देखील बिचुकले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
'बिग बॉस' मालिकेपासून चर्चेत आलेले अभिजीत बिचुकले यांनी पुणे पदवीधर तसेच शिक्षक मतदार संघातून उमेदवारी करत आहेत. येथील छत्रपती शिवाजी कॉलेज याठिकाणी मतदान केंद्रावर ते त्यांच्या पत्नी अलंकृता बिचुकले यांच्या बरोबर गेले होते. अलंकृता बिचुकले यांचे नाव यादीत सापडले. मात्र, अभिजित बिचुकले यांचे नाव नव्हते. अनेक ठिकाणी शोधूनही नाव मिळाले नाही.
निवडणूक आयोगाच्या कारभाराचे खापर त्यांनी भाजप पक्षावर फोडले. प्रशासनही या भोंगळ कारभाराला तितकेच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्रभर माझं नाव पोहोचलं आहे. त्यामुळे मला मतदान करुन न देण्याचा डाव त्यांनी खेळला. तो यशस्वी होणार नाही, असा विश्वासही अभिजित बिचुकले यांनी व्यक्त केला.