सातारा झेडपी नोकर भरती परीक्षेचा तिसरा टप्पा १ नोव्हेंबरपासून

By नितीन काळेल | Updated: October 28, 2023 18:23 IST2023-10-28T18:23:25+5:302023-10-28T18:23:52+5:30

रिक्त ९७२ कर्मचाऱ्यांची पदे भरली जाणार

Satara ZP Job Recruitment Exam 3rd Phase from 1st November | सातारा झेडपी नोकर भरती परीक्षेचा तिसरा टप्पा १ नोव्हेंबरपासून

सातारा झेडपी नोकर भरती परीक्षेचा तिसरा टप्पा १ नोव्हेंबरपासून

सातारा : जिल्हा परिषद भरतीचा तिसरा टप्पा १ नोव्हेंबरपासून सुरू होत असून दोन दिवस चालणार आहे. यामध्ये विविध विभागातील पाच संवर्गासाठी परीक्षा होणार आहे. सातारा जिल्ह्यातही तीन केंद्रावर ही परीक्षा होत आहे.

राज्य शासनाने सर्वच जिल्हा परिषदेत नोकर भरती सुरू केली आहे. परिक्षांच्या माध्यमातून हजारो पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेतीलही रिक्त ९७२ कर्मचाऱ्यांची पदे भरली जाणार आहेत. यासाठी दि. ७ आॅक्टोबरपासून परीक्षा सुरू झाल्या. पहिल्या टप्प्यात लेखा वरिष्ठ सहाय्यक, दोरखंडवाला, कृषी आणि सांख्यिकी विस्तार अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, निम्नश्रेणी आणि उच्चश्रेणी लघुलेखक, लेखा कनिष्ठ सहाय्यकची परीक्षा झाली. त्यानंतर परीक्षेचा दुसरा टप्पाही पार पडला. आता तिसरा टप्पा १ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.

तिसऱ्या टप्प्यात दि. १ नोव्हेंबरला कनिष्ठ यांत्रिकी, यांत्रिकी आणि कनिष्ठ आरेखक या पदासाठी परीक्षा होणार आहे. तर दि. २ नोव्हेंबरला शिक्षण विस्तार अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी परीक्षा होत आहे. सातारा जिल्ह्यात यासाठी सातारा शहरात दोन आणि कऱ्हाडला एक परीक्षा केंद्र आहे. तसेच या परीक्षेसाठी राज्यातील कोणताही उमेदवार पसंदी दिलेल्या जिल्ह्यात परीक्षा देऊ शकतो.

Web Title: Satara ZP Job Recruitment Exam 3rd Phase from 1st November