सातारा: रान गव्याच्या धडकेत महिला गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 12:42 IST2018-08-04T12:39:16+5:302018-08-04T12:42:54+5:30
रान गव्याने दिलेल्या धडकेत जावळी तालुक्यातील ढेणवेळे येथील महिला गंभीर जखमी झाली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता घडली.

सातारा: रान गव्याच्या धडकेत महिला गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू
सातारा : रान गव्याने दिलेल्या धडकेत जावळी तालुक्यातील ढेणवेळे येथील महिला गंभीर जखमी झाली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता घडली.
कोंडाबाई धुळाजी कोकरे (वय ४८) असे जखमी महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोकरे या आपली गुरे चारावयास गावा जवळील शेतात गेल्या होत्या. दिवसभर गुरे चारून सायंकाळी पाचच्या सुमारास आपली गुरे घेऊन त्या घरी परत येत होत्या.
यावेळी अचानक समोरुन आलेल्या रान गव्यांच्या कळपातील एका गव्याने कोंडाबाई कोकरे यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्या दूरवर फेकल्या गेल्या.
धडक दिल्यानंतर गव्यांचा कळप तेथून निघून गेला. गंभीर जखमी अवस्थेत त्या घरी आल्या. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी तत्काळ साताऱ्यातील खासगी दवाखान्यात त्यांना उपचारासाठी दाखल केले.