शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : भिंत अंगावर पडल्याने महिला ठार; दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 14:35 IST

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने फलटणसह विडणी, अब्दागिरी, धुळदेव, गणेशशेरीला झोडपून काढले. झिरपवाडीत मध्यरात्री पाऊणच्या सुमारास भिंत अंगावर पडल्याने छाया साहेबराव जाधव (वय ५२) ही महिला ठार झाली.

ठळक मुद्दे भिंत अंगावर पडल्याने महिला ठार; दोघे जखमीरोपवाटिकेचे नुकसानफलटण तालुक्यात वादळी वाऱ्याने कोट्यवधींचे नुकसान

फलटण/वाठार निंबाळकर : वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने फलटणसह विडणी, अब्दागिरी, धुळदेव, गणेशशेरीला झोडपून काढले. झिरपवाडीत मध्यरात्री पाऊणच्या सुमारास भिंत अंगावर पडल्याने छाया साहेबराव जाधव (वय ५२) ही महिला ठार झाली.

सोनवडीत दोघे जखमी झाले. विडणी येथील उत्तरेश्वर रोपवाटिकेचे सहा सेड जमीनदोस्त झाले. सेडनेट, कागद, पॉलीहाऊस, भिंती, रोपांच्या सहा शेडचे नुकसान झाले. यामुळे ४७ लाखांचे नुकसान झाले.पुणे-पंढरपूर रस्त्यावरील गणेशशेरी, धुळदेव, विडणी, अब्दागिरीवाडी येथे रस्त्याकडेची मोठमोठी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे रस्ता रात्रभरासाठी बंद पडला. त्यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडाली. दुचाकी, चारचाकी वाहने मिळेल त्या मार्गाने मार्गस्थ झाली. मात्र एसटी, ट्रक व इतर वाहने रात्रभर अडकून पडली.

धुळदेव येथील जालिंदर भिवरकर यांच्या घरावरील पत्रे वाऱ्यांने उडून गेले. घर, भिंतीचे वीस हजारांचे नुकसान झाले. घरासमोर साठवून ठेवलेल्या कांद्याचे नुकसान झाले. धनंजय ननावरे यांचा कांदा भिजल्याने सत्तर हजारांचे नुकसान झाले.आंबा, लिंबू, केळी, डाळिंबी आदींची झाडे उन्मळून पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. विडणीतील दत्तोपंत काळुखे यांच्या डाळिंबाचे लाखोंचे नुकसान झाले. टोमॅटो, वांगी, मिरची, गवार, मका, ऊस, द्राक्षे आदींचेही नुकसान झाले.

सोनवडी बुद्रुक येथील यशवंत तात्याबा खिलारे, सदाशिव खिलारे यांच्या घरावरील पत्रे वाºयाने उडले. यात पाच लाखाचे नुकसान झाले. यामध्ये सदाशिव खिलारे गंभीर जखमी झाले. विडणी अब्दागिरेवाडीतील रामचंद्र किसन अब्दागिरे यांच्या घरावरील पत्रे उडाले. यात दोन लाखांचे नुकसान झाले.

बाळासाहेब जिजाबा यांच्या घराची भिंत पडली. यामध्ये तीस हजारांचे नुकसान झाले. तर पांडुरंग धोंडिबा अब्दागिरे यांच्या घराचे पत्रे, भिंत पडल्याने एक लाखाचे नुकसान झाले.वाठार निंबाळकर येथील दशरथ वाडकर यांच्या जनावरांच्या गोठ्यावरील पत्रे उडून व भिंती पडून सुमारे तीस हजार रुपयांचे नुकसान झाले.

विठ्ठल गेनबा ननावरे यांच्या घरावर झाड पडून घराचे चाळीस हजारोंचा नुकसान झाले. बाबा मारुती धायगुडे यांच्या घरावर झाड पडून तीस हजारांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी वीजवाहक तारा तुटल्या आहेत. तहसीलदार विजय पाटील यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, पंचनामे सुरू आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसmonsoon 2018मान्सून 2018