गारपिटीसह वादळाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:34 AM2018-05-28T00:34:06+5:302018-05-28T00:34:06+5:30

Thunderstorms with hail | गारपिटीसह वादळाचा तडाखा

गारपिटीसह वादळाचा तडाखा

Next


कºहाड : शहरासह तालुक्याला रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. तर काही ठिकाणी झाडे मोडून वीज वाहिन्यांवर पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला. शहरातही दत्त चौकासह अन्य वर्दळीच्या रस्त्यांवर झाडे मोडून पडली. त्यामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती.
कºहाड शहरासह गत काही दिवसांपासून उष्णता वाढली होती. ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता व्यक्त केली जात असतानाच रविवारी दुपारी शहरासह तालुक्यातील कोपर्डे हवेली, सैदापूर, ओगलेवाडी, मलकापूर, चचेगाव, पाचवड, ओंड, उंडाळे, नांदगाव, वारुंजी, केसे, सुपने या भागात जोरदार पावसासह वादळी वाºयाचा तडाखा बसला. कºहाडसह आसपासच्या उपनगरांमध्ये वाºयामुळे झाडे मोडून पडली. शहरातील दत्त चौक, शाहू चौक या परिसरात रस्त्यानजीक असलेली झाडे पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तसेच गारपिटीमुळेही वाहने जागीच थांबविण्यात आली होती. तालुक्यात काही ठिकाणी बहरात आलेल्या आंब्यांचा झाडाखाली फळांचा खच वडला होता. वादळी वारे, गारपिटीसह सुमारे तासभर सुरू असलेल्या पावसाने नागरिकांची त्रेधा उडाली. अचानक झालेल्या या पावसाने शहरातील सखल भागासह रस्त्यावरही तळे साचले होते. पाण्यातून वाट काढताना चालकांना कसरत करावी लागत होती. तालुक्यातील काही गावांमध्ये शेतात पाणी साचले होते. तर मुख्य रस्त्यांवर असणारे खड्डे भरल्याने तेथे तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.
दरम्यान, पाऊस थांबल्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पालिकेच्या वतीने शहरातील रस्त्यावर मोडून पडलेली झाडे हटविण्यात आली. तसेच सखल भागात साचलेले पाणीही काढण्यात आले. त्यामुळे वाहतूक पूर्ववत झाली.
दुकानांचे फलक वाºयावर
कºहाडात अनेक व्यावसायिक आपल्या दुकानांचे लहान फलक रस्त्यानजीक उभे करून ठेवतात. मात्र, रविवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाºयामुळे बहुतांश दुकानांचे फलक अक्षरश: वाºयासोबत उडून गेले. शहरातील चावडी चौकात असणाºया एका हॉटेलचा फलक तर वीज वाहिन्यांवर जाऊन अडकला होता. हे फलक गोळा करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत व्यावसायिकांची धावाधाव सुरू होती.

Web Title: Thunderstorms with hail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.