हिंगोलीला मान्सूनपूर्व पाऊस, वादळी वाऱ्याचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:28 AM2018-05-28T00:28:14+5:302018-05-28T00:28:14+5:30

२६ मे रोजी अचानक झालेला अवकाळी पाऊस व वीजेच्या कडकडाटांसह वादळी वाºयामुळे अनेकांच्या घरावरील टीनपत्रे उडाली, वीज पडल्याने गुरेही दगावल्याच्या घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडल्या. रात्रभर वीजपुरवठा खंडीत होता. वादळी वाºयाचा पक्ष्यांनाही फटका बसला असून शेकडो पक्षी मृत्यूमुखी पडले. अवकाळी पाऊस वादळी वाºयाचा जिल्ह्याला फटका बसला असून काही ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेकडून पंचनामा केला जात आहे.

 Pre-monsoon rain, wind storm hits Hingoli | हिंगोलीला मान्सूनपूर्व पाऊस, वादळी वाऱ्याचा फटका

हिंगोलीला मान्सूनपूर्व पाऊस, वादळी वाऱ्याचा फटका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : २६ मे रोजी अचानक झालेला अवकाळी पाऊस व वीजेच्या कडकडाटांसह वादळी वाºयामुळे अनेकांच्या घरावरील टीनपत्रे उडाली, वीज पडल्याने गुरेही दगावल्याच्या घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडल्या. रात्रभर वीजपुरवठा खंडीत होता. वादळी वाºयाचा पक्ष्यांनाही फटका बसला असून शेकडो पक्षी मृत्यूमुखी पडले. अवकाळी पाऊस वादळी वाºयाचा जिल्ह्याला फटका बसला असून काही ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेकडून पंचनामा केला जात आहे.
२६ मे रोजी जिल्हाभरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. विजांचा कडकडाट अन् सोसाट्याच्या वाºयामुळे वीजपुरवठाही खंडित झाला. वादळीवाºयामुळे अनेक गावांत घरावरील पत्रे उडाली. तसेच केळीच्या बागांचेही मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शनिवारी अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे रविवारी शासकीय सुट्टी आली. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेकडून पंचनाम्यास सुरूवातच झाली नाही.
कळमनुरीत वीज पडून म्हैस दगावली
कळमनुरी : तालुक्यात २६ मे रोजी रात्री ८ ते ९ वाजेच्या सुमारास वादळी वारा, वीजेच्या कडकडाटासह पाऊस झाला.
कान्हेगाव येथील नंदकुमार वाघमारे यांची बाभळीच्या झाडाला बांधलेली म्हैस वीज पडल्याने दगावली. म्हशीची किंमत अंदाजे ६५ हजार रूपये आहे. २७ मे रोजी तलाठी सुधीर इंगळे यांनी कान्हेगाव येथे जावून स्थळ पाहणी करून पंचनामा केला. त्याचा अहवाल तहसिल कार्यालयात सादर करण्यात आला आहे.
टीनपत्रे उडाली; वीजपुरवठा खंडीत
डोंगरकडा : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा व परिसरातील भाटेगाव, जामगव्हाण, सुकळीवीर, वरूड, हिवरा, झूनझूनवाडी, देववाडी चिंचवाडी आदि गावामध्ये दि. २६ मे रोजी सायंकाळी ९ वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वाºयासह व विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. यामध्ये सुकळीवीर येथील घरावरील पत्रे पाहण्यासाठी गावकºयांची धावपळ उडाली.
रात्री ९ वाजल्यापासून बाळापूर ते वारंगा या दरम्यान वीजेचे तार तूटल्यामुळे डोंगरकडा सह भारेगाव, जामगव्हाण, सुकळीवीर, वरूड, हिवरा, झुनझूनवाडी, दवेवाडी, चिंचवाडी आदि गावामध्ये विद्यूत पुरवठा खंडित झाल्याने रात्र अंधारातच व प्रचंड उकाड्यामध्ये काढावी लागली. २७ मे रोजी दूपारी २:३० वाजेपर्यंतही विद्यूत पुरवठा सुरु झाला नव्हता. याबाबत डोंगरकडा विद्यूत कंपनीचे कनिष्ठ अभियंता जांभूळे यांना विचारले असता वादळी वाºयामुळे तारा तुटून विद्युत पूरवठा खंडित झाल्याचे सांगण्यात आले.
वादळी वाºयामुळे शेतकºयांचे नुकसान
हयातनगर : वसमत तालुक्यातील हयातनगर, जवळा खु, जवळा बु, पळशी, लिंगी, इंद्रानगर परिसरात २६ मे रात्री १०.१५ च्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटासह वादळी वाºयाला सुरुवात झाली. जवळपास दीड तास वादळी वाºयासह गारांचा पाऊस सुरू होता.
वादळी वाºयात गावातील नागरिकांच्या घरावरील टीनपत्रे उडाले. तर काही ठिकाणी भिंंतीही कोसळल्या. वादळी वाºयात टीनपत्रे उडून गेल्याने यावेळी अनेकांना मार लागला. शेतातील गोठ्यातील टीनपत्रे उडाल्याने जनावरेही जखमी झाल्या घटना घडल्या आहेत. शेतातील झाडेही कोसळली. वादळी वाºयासह झालेल्या अवकाळी पाऊसामुळे शेतकºयांच्या शेतातील ज्वारीचा कडबा व सोयाबीनच्या कुटारांचेही नुकसान झाले. वादळी वाºयांमुळे ५० ते ६० बगळे मृत्यूमुखी पडले. गावतील विजेचे खांब, विद्युततारा तुटल्याने परिसरातील वीजपुरवठा रात्रीपासून वीजपुरवठा बंद होता. त्यामुळे पाण्याचा प्रश्न व गिरण्याही बंद होत्या. उडालेले टीनपत्रे जमा करण्याच्या कारणावरून वादही निर्माण झाले होते. येथे कार्यरत तलाठी गीते यांनी नुकसानीची पाहणी करण्यास सुरूवात केली आहे. नुकसान झाल्याचा सविस्तर अवाहल वरिष्ठा अधिकाºयांना सादर केला जाईल असेही यावेळी त्यांनी सांगितले. नुकसानीची तात्काळ मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
जवळा पांचाळ येथे पाऊस
जवळा पांचाळ : कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ येथे शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अचानक चक्रीवादळासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. अंदाजे एक तासभर वादळी वाºयासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या वादळी वाºयामध्ये ज्वारी, शेतातील शेतकºयांची केळी हे पीक भुईसपाट झाले. काही शेतकºयांच्या केळी तर काढायला आल्या होत्या. सध्याच्या स्थितीत सर्वत्र पाणीटंचाई आहे. त्यातही शेतकºयांनी विकतचे पाणी बागांना दिले होते. परंतु अवकाळी पाऊस व वादळी वाºयामुळे शेतकºयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे रस्त्यालगतची झाडेही वाºयामुळे मुळापासून उखडून रस्त्यावर पडली. सकाळी जवळा डोंगरकडा रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. अनेकांच्या घरावरील टीनपत्रेही उडून गेले. विद्युत खांबही उखडून पडले होते. वादळी वाºयामुळे एकच धावपळ उडाली होती.
अवकाळी पाऊस व वादळी वाºयामुळे जिल्हाभरातील वीजसेवा कोलमडली आहे. अनेक ठिकाणी महवितरणकडून दुरूस्ती मोहिम हाती घेतली आहे. परंतु काही ग्रामीण भागात अद्याप महावितरणचे अधिकारी कर्मचारी पोहचले नाहीत. त्यामुळे तेथील वीजसमस्या कायम आहे.
शनिवारी झालेल्या वादळी वाºयामुळे अनेक ठिकाणचे विद्युतखांब, वीजतारा तुटून पडल्या आहेत. त्यामुळे गावे अंधारात आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे महावितरणने लक्ष देण्याची मागणी आहे.
महसूल प्रशासना तर्फे काही गावांत पंचनामे सुरू केल्याचे ग्रामस्थांतून सांगितले जात आहे. मात्र अनेक गावांत ही प्रक्रिया सुरू झाली नाही, त्यामुळे शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी आहे.
वादळी वाºयामुळे केळीच्या बागांचे नुकसान
वारंगा फाटा : शनिवारी रात्री झालेल्या जोरदार वादळी वाºयांसह झालेल्या पावसामुळे वडगाव, वसफळ, रेडगाव परिसरातील केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विविध प्रकारची झाडेही पडली. तर विद्युत तारा तुटल्याने रात्रीपासून वीजपुरवठा देखील खंडित होता. २६ मे रोजी रात्री ९ वाजेनंतर दांडेगाव परीसरात विजांचा कडकडाट,वादळी वाºयांसह जोरदार पाऊस झाला. वाºयाचा वेग एवढा होता की, त्यामुळे वडगाव, रेडगाव, वसफळ, जवळा पांचाळ इ. ठिकाणी केळीच्या विक्रीस आलेल्या तयार फळांच्या घडासह झाडे आडवी झाली. त्यामुळे शेतकºयांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. पाणीटंचाई असूनही बागा शेतकºयांनी वाचविल्या होत्या. मात्र अस्मानी संकटामुळे शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसाळा जवळ आलेला असताना हात-तोंडाशी आलेला घासच निसर्गाने हिसकावून घेतल्याचे चित्र परिसरात निर्माण झाले आहे. विद्युततारा तुटल्याने शनिवारी रात्रीपासून २७ मे रोजी दिवसभर दांडेगाव, वारंगा फाटा, डोंगरकडा, जवळा पांचाळ आदी परिसरात विद्युत पुरवठा बंद होता. वडगाव येथील तलाठी पांचाळ यांनी प्राथमिक पाहणी केली. नुकसानी संदर्भात संबंधित तलाठ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी फोनच उचलला नाही. त्यामुळे किती नुकसान झाले हे समजू शकले नाही. कुर्तडी येथील वनेश्वर शिवारात वादळी वाºयासह झालेल्या पावसाने अनेकांच्या घरांवरील टीनपत्रे उडाले. तसेच महावितरणचे दहा विद्युतखांब आणि एक विद्युत रोहित्रही जमीनदोस्त झाले आहे. शेती शिवारात असलेले विद्युत रोहित्र जमीनदोस्त झाले असून विजेचे दहा खांब पडल्याची माहिती वारंग्याचे अभियंता (जे. ई) लालमे यांनी दिली. त्यामुळे येथील वीजपुरवठा बंद आहे.
वसमत येथे दोन ठिकाणी वीज कोसळली
वसमत : वसमत शहर व तालुक्यात शनिवारी रात्री वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. यात वसमत शहरात एका घरावर व एका झाडावर अशा दोन जागी कोसळली घरातील पंखे व इलेक्ट्रिकल साहित्याचे नुकसान झाले. वसमत येथील सुवर्णंकार कॉलनी भागातील बाबाराव कदम यांच्या घराच्या छतावर वीज कोसळली. यात टॉवर भिंतीवर रोवलेल्या छत्रीसह भिंतीचा काही भाग निखळला. अनेकांच्या घरातील पंखे व इतर इलेक्ट्रिकल साहित्य जळून खाक झाले. तर प्रियदर्शनी कॉलनीतील एका लिंबाच्या झाडावर वीज कोसळली. दोन जागी वीज पडल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. तालुक्याच्या ग्रामीण भागातही वादळी वाºयासह पावसामुळे ग्रामस्थांची तारांबळ उडाली. घरावरील पत्रे उडाले, झाडे पडली शिवाय वीज पुरवठाही खंडित झाला. त्यामुळे ग्रामस्थांना अंधारातच रात्र काढावी लागली. महावितरणकडून रविवारी वीजतारा जोडणीचे काम सुरु झाले होते.
महाकाय वृक्ष वादळात जमिनदोस्त...
आखाडा बाळापूर : शंभर वर्षाच्या पुर्वीपासून आपल्या असण्याची खून (ओळख) अबाधित ठेवणारे, सावली, फळ देता देता अनेक सुख दुखाचा, तंटे वादाचा, प्रेमळ भेटींचा, सोयरिक, फारकतींचा साक्षीदार असलेले हुतात्मा स्मारका आवारातील कवटाचे झाडे वादळी वाºयाने उन्मळून पडले. बाळापूर परिसरातील खेडे गावामधील लोकांचे भेटण्याचे ठिकाण, ओळखीची खून असलेले हे झाड शंभर वर्षापासूनच्या पुर्वीही हक्काचे ठिकाण होते. अनेकांशी भावनिक नाते जोडणारे हे झाडे वादळात पडल्याने अनेकांनी जमिनदोस्त झाड पाहून हळहळ व्यक्त करीत आठवणींना उजाळा देत होते. २६ मे रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास बाळापूर परिसरात तुफान वादळी वारे वाहत पावसाने हजेरी लावली. बाळापूर येथील हुतात्मा स्मारकाच्या आवारात असलेले ऐतिहासीक कवटाचे झाड मुळासकट उन्मळून पडले. शेकडो वर्षापासून अनेक उन्हाळे, पावसाळे पाहत, अनेक सुखदुखांना आंतरिक साक्ष देत अस्तित्व टिकवणारे झाड शनिवारी झालेल्या वादळी वाºयात अखेर जमीनदोस्त झाले.
गिरगावात वादळी वाºयामुळे पिकांचे नुकसान
कुरूंदा : वसमत तालुक्यातील गिरगाव येथे शनिवारी रात्रीला झालेल्या वादळी वाºयाच्या तडाख्यामुळे केळीच्या बागा उलथून पडल्याने केळी उत्पादक शेतकºयांचे नुकसान झाले आहे.

Web Title:  Pre-monsoon rain, wind storm hits Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.