साताऱ्यात महिलेचा विनयभंग, एकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 19:13 IST2019-05-18T19:12:11+5:302019-05-18T19:13:45+5:30

सातारा येथील जुना आरटीओ परिसरात एका २८ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

In Satara, a woman has been booked for molestation | साताऱ्यात महिलेचा विनयभंग, एकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

साताऱ्यात महिलेचा विनयभंग, एकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठळक मुद्देसाताऱ्यात महिलेचा विनयभंगएकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सातारा : येथील जुना आरटीओ परिसरात एका २८ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संतोष चंद्रकांत जेधे (रा. वेलंग, ता. वाई) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, संबंधित पीडित महिला वाई तालुक्यातील असून, गुरुवारी ही महिला साताऱ्यांत आली होती.

जुना आरटीओ परिसरात एका रिक्षामध्ये बसत असताना संतोष जेधे याने त्या महिलेला तू माझ्याशी बोल नाही तर मी जीव देईन, अशी धमकी देऊन अश्लील कृत्य केले. या प्रकारानंतर संबंधित पीडित महिलेने शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

Web Title: In Satara, a woman has been booked for molestation