सातारा : रहिमतपूर-अंभेरी रस्त्यावर शॉक लागून वायरमन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 13:13 IST2018-06-12T13:13:00+5:302018-06-12T13:13:00+5:30
रहिमतपूर-अंभेरी रस्त्यावरील विजेच्या खांबावर काम करत असताना शॉक लागून वायरमनचा जागीच मृत्यू झाला.

सातारा : रहिमतपूर-अंभेरी रस्त्यावर शॉक लागून वायरमन ठार
रहिमतपूर : रहिमतपूर-अंभेरी रस्त्यावरील विजेच्या खांबावर काम करत असताना शॉक लागून वायरमनचा जागीच मृत्यू झाला.
सचिन वसंत फाळके (३५ रा. सातारारोड, ता. कोरेगाव) असे मृताचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, गेल्या पाच वर्षांपासून सचिन फाळके रहिमतपूर उपकेंद्र महावितरण कार्यालयात वायरमन म्हणून काम होते.
एसटी स्टँडरोड ते अंभेरी रस्त्यावर सोमवारी सायंकाळी विजेच्या खांबावर ते दुरुस्तीचे काम सुरू होते. याचवेळी अचानक विद्युतप्रवाह सुरू झाला.
दरम्यान, विजेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. बराच वेळ या घटनेची माहिती कोणालाच कळू शकली नाही. त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा शोध घेतला असता त्यांना सचिन हे मृतावस्थेत आढळून आले. रात्री उशिरा याबाबत रहिमतपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.