शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : मुबलक पाणी असतानाही मेढ्याला दिवसाआड पाणीपुरवठा, नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 12:20 IST

मुबलक पाणी असूनही केवळ प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळे जावळी तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या मेढा शहराला गेल्या दोन वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

ठळक मुद्देमेढा शहराला दोन वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया

मेढा : मुबलक पाणी असूनही केवळ प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळे जावळी तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या मेढा शहराला गेल्या दोन वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.मेढा हे जावळी तालुक्याचे मुख्य ठिकाण असून देखील या शहराला गेल्या २० वर्षांपासून नियमित व शुद्ध पाणीपुरवठा होत नाही. तसेच या शहरासाठी स्वतंत्र पाणी योजना देखील नाही. मेढ्यासाठी १९९० च्या आसपास एक जॅकवेल पाणी योजना सुरू केली. मात्र २ ते ३ वर्षांतच ही योजना बंद पडली.

त्यानंतर १९९६-९७ साली मेढा व ८ गावांसाठी प्रादेशिक नळ पाणी योजना सुरू झाली, ही योजना १९९७ ते २००२ पर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत चालवली. त्यानंतर २००२ ते २००९ पर्यंत ही योजना जिल्हा परिषदेने चालवली. यावेळी जिल्हा परिषदेने काही काळ ही योजना कंत्राटी पद्धतीने चालवण्यास दिली. त्या कंत्राटदाराने ही योजना परवडत नाही म्हणून सोडून दिली. यानंतर ही योजना २००९ ते २०१६ पर्यंत स्थानिक समिती मार्फत चालवली व त्यांनीही सोडून दिली.दरम्यान, गेल्या ७ते ८ वर्षांपासून या योजनेचा बोजवारा उडाला असून अनेकदा वीजबिल थकल्याने, तसेच समितीच्या चुकीच्या कारभारामुळे मेढेकरांना नियमित व शुद्ध पाणीपुरवठा होत नाही. या समितीच्या काळात सुरूवातीला आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. तर यानंतर एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला.

या योजनेची लाखो रुपयांची बाकी थकीत झाल्याने वीज वितरण कंपनीकडून अनेकदा वीजपुरवठा खंडित झाला. त्यांनतर या समितीने थकीत वीज बाकी सुमारे १३ लाख रुपये जनतेच्या डोक्यावर ठेवून ही योजना सोडून दिली आणि त्याच बरोबर एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची नवा पायंडा पाडला. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी